Coronavirus Impact: फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेलाही बसला कोरोना व्हायरसचा फटका, यंदा 'या' तारखेला होणार सुरुवात

आयोजकांनी मंगळवारी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. फ्रेंच ओपन 18 मे ते 7 जून या कालावधीत आयोजित करण्यात आले होते, परंतु आता याचे आयोजन 20 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत केले जाईल.

फ्रेंच ओपन (Photo Credit: IANS)

कोरोना व्हायरस (Coronavirus) सर्व विश्वभर पसरलेल्या साथीच्या आजारामुळे फ्रेंच टेनिस महासंघाने फ्रेंच ओपन (French Open) टेनिस स्पर्धा 3 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयोजकांनी मंगळवारी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. फ्रेंच ओपन 18 मे ते 7 जून या कालावधीत आयोजित करण्यात आले होते, परंतु आता याचे आयोजन 20 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत केले जाईल. सध्या कोरोन विषाणूमुळे जगभरात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, त्यामुळे खेळाडू समवेत सर्वांची सुरक्षा लक्षात घेत स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोलँड गॅरोस (Roland Garros) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलला सांगितले की,"18 मे पासून स्पर्धा आयोजित करणे शक्य नव्हते. सप्टेंबरपर्यंत स्पर्धा पुढे ढकलण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता." क्रीडा विश्वातील अनेक स्पर्धांना कोरोना विषाणूचा फटका बसला आहे आणि आता यात फ्रेंच ओपनचेही नाह शामिल झाले आहे. (कोरोनाग्रस्तांसाठी Cristiano Ronaldo चे मोठे पाऊल; Pestana CR7 या हॉटेलचे हॉस्पिटलमध्ये रुपांतर आणि मोफत सुविधा)

कोविड-19 मुळे सर्व सार्वजनिक आरोग्याच्या संकटाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. स्पर्धेच्या आयोजनात सामील असलेल्या प्रत्येकाचे आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी फ्रेंच टेनिस फेडरेशनने 20 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2020 या कालावधीत रोलँड गॅरोसची 2020 आवृत्ती आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. रोनाल्ड गॅरोसने आपल्या संकेतस्थळावर लिहिले की, "18 मे पर्यंत परिस्थिती कशी असेल याचा कोणालाही अंदाज येत नसेल तरी या क्षणी प्रत्येकाला ज्या प्रकारे एकटे राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्या स्पर्धेची तयारी करणे आमच्यासाठी अशक्य आहे. आम्ही वेळेवर स्पर्धा आयोजित करू शकणार नाही, आम्हाला आमच्या कर्मचार्‍यांचे आरोग्य लक्षात ठेवले पाहिजे. आमच्याकडे आता एकच पर्याय उरला आहे."

यूईएफए युरो 2020 आणि कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेनंतर फ्रेंच ओपन ही दुसरी सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आहे जिला कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. युरो 2020 कोपा अमेरिका पुढील वर्षी 11 जून ते 11 जुलै दरम्यान 2021 मध्ये खेळला जाण्याची शक्यता आहे.