Alberto Nonino: चड्डीने दिला धोका, धावताना लिंग बाहेर आल्याने इटलीच्या धावपटूने गमावली शर्यत, पाहा व्हिडिओ
ज्याचा आपण कधी विचारही करत नाही. जागतिक अॅथलेटिक्स U20 चॅम्पियनशिप 2022 (World Athletics U20 Championships) मध्ये 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत अशीच काहीशी घटना पाहायला मिळाली. या घटनेचा व्हिडिओही आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
खेळाच्या मैदानावर कधी कधी अशा काही घटना घडतात. ज्याचा आपण कधी विचारही करत नाही. जागतिक अॅथलेटिक्स U20 चॅम्पियनशिप 2022 (World Athletics U20 Championships) मध्ये 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत अशीच काहीशी घटना पाहायला मिळाली. या घटनेचा व्हिडिओही आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धावण्याच्या शर्यतीत वापरलेल्या चड्डीने आयत्या वेळी धोका दिल्याने एका धावपटूला चक्क ती स्पर्धा जिंकता जिंकता गमवावी लागली आहे. अलबेर्टो नोनिनो (Alberto Nonino) असे या धावपटूचे नाव आहे. तो मूळचा ईटलीचा आहे.
अलबेर्टो नोनिनो (Alberto Nonino) हा कोलंबिया येथील 2022 च्या जागतिक अॅथलेटिक्स U20 चॅम्पियनशिप स्पर्धेत 400 मिटर धावण्याच्या शर्यतीत धावत होता. त्याची कामगिरीही चांगली होती. सुरुवातीलाच त्याने मोठी धाव घेतल्याने तो बऱ्यापैकी पहिल्या 5 खेळाडूंमध्ये धावत होता. सर्वांच्या नजरा या पहिल्या पाचांवरच होत्या. असे असताना अचानकक अलबेर्टो नोनिनो याचा वेग मंदावला. सुरुवातीला प्रेक्षकांना काहीच कळाले नाही. त्यांना वाटले की, बहुदा तो दमला असावा किंवा तो तितका वेग धारण करु शकत नसावा. कॅमेऱ्यांना मात्र असे काहीच वाटत नव्हते. ते प्रत्यक्षात काय घडत आहे ते टीपत होते. कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले की, तो उजव्या हाताने लिंगाजवळ काहीतरी पकडून धावत होता. नंतर लक्षात आले की, काहीतरी नव्हे तो लिंगच पकडून धावत होता. या घटनेचे अनेकांना आश्चर्य वाटले. (हेही वाचा, Uttar Pradesh: धडधाकट तरुणाचे लिंग कापले; दोन 'तृतीयपंथी' व्यक्तिंवर गुन्हा दाखल)
व्हिडिओ
का आणि काय घडले असे?
अलबेर्टो नोनिने याच्याबाबत LADbible साठी क्रीडा पत्रकार डेव्हिड सांचेझ डी कॅस्ट्रोने ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, 18 वर्षीय अल्बर्टो नोनिनो, जो मूळचा इटलीचा आहे. तो कॅली, कोलंबिया येथे 400 मीटर डेकॅथलॉनमध्ये स्पर्धा करत होता. अल्बर्टो नॉनिनोने त्याच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध वेग वाढवून अत्यंत चांगली सुरुवात केली. ज्यामुळे तो शर्यत अगदी सहजतेने जिंकू शकेल अशी आशा उपस्थितांना वाटू लागली. दरम्यान, नॉनिनोने मधली लेन पार केल्यानंतर, तो काहीसा अस्वस्थ दिसला. एक-दोन वेळा तो जांघ (crotch) पकडूनही धावताना दिसला. या सर्व गडबडीत त्याचा वेग कमी झाला. त्याचाचा फायदा घेत त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्याला मागे टाकले. परिणामी ही शर्यत त्याला गमवावी लागली. या घटनेबाबत अधिक खुलासा पुढे आला तेव्हा कळले की, या धावपटूची चड्डी ढिल्ली होती. त्यामुळे धावताना ती सारखी खाली घसरत होती. परिणामी त्यातून लिंग बाहेर डोकावत होते. त्यामुळे ते पकडून धावताना या धावपटूला मर्यादा आल्या परिणामी तो स्पर्धेतून पराभूत झाला.