U23 World Wrestling Championships 2024: ऑलिम्पिक 2024 मध्ये यावेळी भारताच्या हातून सुवर्ण पदक हूकले होते. कधी क्रीडा मंत्रालयाने भारतीय महासंघावर बंदी घातली तर कधी संयुक्त जागतिक कुस्तीने बंदी घातली. सध्या, संयुक्त जागतिक कुस्तीने भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी उठवली आहे. कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनमध्ये भारतीय कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. भारताचा कुस्तीपटू चिराग चिकारा (Chirag Chikara) 23 वर्षांखालील जागतिक चॅम्पियन (Wrestling World Champion ) बनणारा तिसरा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे, या पदकासह भारताने स्पर्धेत नऊ पदके जिंकली आहेत.
भारताचा कुस्तीपटू चिकाराने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटामध्ये फायनलच्या बाऊटमध्ये तिन सेकंदात किर्गिस्तानच्या अब्दिमालिक काराखोववर 4-3 असा विजय मिळवला. सेहरावतने 2022 मध्ये स्पर्धेच्या समान वजन गटात ही कामगिरी केली. तर, रितिका हुड्डा गेल्या वर्षी 76 किलो गट जिंकून स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली होती. (हेही वाचा:Bangladesh vs South Africa 2nd Test 2024 Live Streaming: दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत बांगलादेशला पराभूत करून मालिका जिंकण्याचा प्रयत्नात, थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या )
भारताचे राष्ट्रगीत वाजले
गेल्या वर्षी रितिका या स्पर्धेत सहभागी झाली होती. तेव्हा भारतीय महासंघाने बंदी घातली होती. अशा परिस्थितीत रितिका यूडब्ल्यूडब्ल्यूसाठी खेळली. त्यात तिने सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर राष्ट्रगीत वाजवले गेले नाही. मात्र, त्यानंतर आता चिराग जिंकल्यावर या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रगीत वाजवण्यात आले. चिकाराने अंतिम फेरी गाठण्यापूर्वी प्रभावी कामगिरी केली. त्याने प्री-क्वार्टर फायनलमध्ये गौकोटो ओझावाचा 6-1, शेवटच्या आठ टप्प्यात युनस एव्हबॅटिरोव्हचा 12-2 आणि सेमीफायनलमध्ये ॲलन ओरलबेकचा 8-0 असा पराभव केला.
भारतीय महिला कुस्ती संघानेही एक रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकून चांगली कामगिरी केली. अंजलीने 59 किलो गटात रौप्यपदक जिंकले, तर नेहा शर्मा (57 किलो), शिक्षा (65 किलो) आणि मोनिका (68 किलो) यांनी कांस्यपदक जिंकले. दहियाने 2018 मध्ये अंडर-23 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते.
भारताचे सर्व पदक विजेते
सुवर्ण पदक – चिराग चिकारा – पुरुषांच्या फ्रीस्टाईलमध्ये 57 किलो वजनी गट
रौम्य पदक – अंजली – महिलांच्या फ्रीस्टाइलमध्ये 59 किलो वजनी गट
रौप्य पदक – शिक्षा – महिलांच्या फ्रीस्टाइलमध्ये 65 किलो वजनी गट
कांस्यपदक – मोनिका – महिलांच्या फ्रीस्टाइलमध्ये 68 किलो वजनी गट
कांस्यपदक – नेहा शर्मा – महिलांच्या फ्रीस्टाइलमध्ये 57 किलोवजनी गट
कांस्यपदक – विश्वजीत मॉर्न – 59 किलोग्रॅम फ्री स्टाईल वजनी गट
कांस्यपदक – ग्रीस मॉर्न- 59 किलोग्रॅम फ्री स्टाईलमध्ये
कांस्यपदक – विकी – पुरुषांच्या फ्रीस्टाइलमध्ये 97 किलो
कांस्यपदक – सुजित कलकल – पुरुषांच्या फ्रीस्टाइलमध्ये 70 किलो
कांस्यपदक – अभिषेक ढाका – पुरुषांच्या फ्रीस्टाइल 61 किलोमध्ये