NZ vs SA, ICC World Cup 2019: न्यूझीलंडचा विजयी चौकार, दक्षिण आफ्रिकेचं आव्हान संपुष्टात
आफ्रिकेकडून ख्रिस मोरिस ने तीन विकेट्स घेतल्या तर रबाडा, पेहलुक्वायो आणि एनगिडी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
न्यूझीलंड (New Zealand) ने चार गाडी राखून दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाचा पराभव करत विश्वकपमध्ये आपला चौथा विजय साजरा केला. दुसरीकडे, हा दक्षिण आफ्रिकेचा हा चौथा पराभव ठरला. पहिले फलंदाजी करून आफ्रिकेनं न्यूझीलंड सामोर 242 धावांचं आव्हान दिले होते. न्यूझीलंडने केन विलिएमसन (Kane Williamson) च्या शतकाच्या आणि ग्रॅण्डहोमच्या अर्धशतकाच्या जोरावर पूर्ण केलं.
केन विलिएमसन जेव्हा फलंदाजी ला आला तेहवा न्यूझीलंडची स्तिथी 4 बाद 80 अशी होती. कर्णधार विलिएमसन ने जेम्स नीशम (James Neesham) सोबत 57 धावांची भागिदारी करत डाव सावरला. निशमनंतर आलेल्या ग्रॅण्डहोमने विलिएमसन (Colin de Grandhomme) सोबत 91 धावांची भागिदारी करत विजय साजरा केला. आफ्रिकेकडून ख्रिस मोरिस (Chris Morris) ने तीन विकेट्स घेतल्या तर रबाडा (Kagiso Rabada), पेहलुक्वायो (Andile Phehlukwayo) आणि एनगिडी (Lungi Ngidi) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
न्यूझीलंडविरुद्ध पराभव हा दक्षिण आफ्रिकेचा विश्वकपमधील चौथा पराभव होता. शिवाय या सामन्यात पराभव झाल्यास आफ्रिकेचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांच्यासाठी हा सामना करो किंवा मरो असाच आहे.