Coronavirus: फटाके फोडल्यावरून भाजप खासदार गौतम गंभीर नाराज, म्हणाला-'ही उत्सव साजरा करण्याची वेळ नाही'
रविवारी रात्री देशाच्या अनेक भागात फटाके जाळल्याचे वृत्त समोर येऊ लागले. त्या संदर्भात पूर्व दिल्लीचे भाजपा खासदार गौतम गंभीर म्हणाले की, "ही फटाके फोडण्यास वेळ नाही."
भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) ट्विटरवरुन रविवारी रात्री फटाके फोडणार्यावर नाराजी व्यक्त केली आणि कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) भीतीने सर्वांना घरातच राहायला सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय नागरिकांना देशात कोविड-19 (COVID-19) विरूद्ध लढाईत एकता दर्शविण्यासाठी दिवे, मेणबत्त्या लावण्याचे आवाहन दिले होते. परंतु रविवारी रात्री देशाच्या अनेक भागात फटाके जाळल्याचे वृत्त समोर येऊ लागले. त्या संदर्भात पूर्व दिल्लीचे भाजपा खासदार गंभीर म्हणाले की, "ही फटाके फोडण्यास वेळ नाही." पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता देशातील नागरिकांनी दिवे, मेणबत्त्या आणि मोबाईलचे दिवे 9 मिनिटांसाठी लावून एकता दर्शविली. गंभीरशिवाय भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंहनेही फटाके फोडण्यावर जोरदार टीका केली. बातमीनुसार रविवारी रात्री फटाक्यांमुळे राजधानी दिल्लीच्या एका इमारतीत आग लागली होती, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (Coronavirus: भाजप खासदार गौतम गंभीर ने MPLAD फंडमधून केजरीवाल सरकारला पुन्हा केली लाखो रुपयांची मदत)
माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गंभीरने ट्वीट करून म्हटले की, "भारत घरात रहा! आपण सध्या लढाईच्या मध्यभागी आहोत (कोरोना व्हायरसविरूद्ध), ही फटाके फोडण्याची ही वेळ नाही." दिल्ली-नोएडासह बर्याच ठिकाणी काही लोकांनी मूर्खपणाची मर्यादा ओलांडून फटाके फोडले. याशिवाय बर्याच ठिकाणाहून लोकं सामाजिक अंतर न राखता रस्त्यावर उतरले असल्याचे वृत्तही समोर येत होते. दिल्लीत काही ठिकाणी मोबाईल फ्लॅश लाईट लावून काही कोरोना इडियट रस्त्यावर उतरले होते.
दुसरीकडे, हरभजनने व्हिडीओ रीट्वीट केला आणि लिहिले: “आपल्याला कोरोनाचा इलाज सापडेल पण मूर्खपणावर उपचार कसा मिळणार?”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सामूहिक संकल्पांचे निवेदन देण्याच्या आवाहनाला उत्तर देताना रविवारी वेगाने पसरलेल्या कोविड-19 विरुद्ध लढाईत एकता दर्शविण्यासाठी भारताच्या क्रीडापटूंनीही सहभाग घेतला. सचिन तेंडुलकर, हरभजन, विराट कोहली, रोहित शर्मा, अनिल कुंबळे यांनी आपापल्या घरी राहून दिवे लावले आणि या लढाईत आपला पाठिंबा दर्शविला.