KXIP vs MI, IPL 2020: रोहित शर्माने 38वे अर्धशतक ठोकून केली सुरेश रैनाच्या रेकॉर्डची बरोबरी, चिमुरड्या समायराने असं केलं सेलिब्रेट, पाहा Photo

रोहितची आता आयपीएलचे 38 अर्धशतकं आहेत. रोहितने अर्धशतकी डाव खेळला तर त्याची मुलगी समायरा देखील आईसोबत टिव्हीवर सामना पाहत बाबांना प्रोत्साहन देताना दिसली.

रोहित शर्मा आणि मुलगी समायरा शर्मा (Photo Credit: PTI/Instagram)

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) गुरुवारी अबु धाबी येथे किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या सामन्यात दुसरे अर्धशतक ठोकले. या दरम्यान रोहितने 5000 आयपीएल धावांचा टप्पा गाठला आणि विराट कोहली आणि सुरेश रैना (Suresh Raina) नंतर आयपीएल (IPL) 5000 क्लबचा तिसरा सदस्य बनला. रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केल्यावर चेन्नई सुपर किंग्जच्या रैनाच्या विक्रमाचीही बरोबरी केली. रोहितची आता आयपीएलचे 38 अर्धशतकं आहेत. रैना आणि रोहित दोघांनी स्पर्धेत एका भारतीय खेळाडूने सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याचा विक्रम नोंदविला आहे. रोहितने अर्धशतकी डाव खेळला तर त्याची मुलगी समायरा (Samaira) देखील आईसोबत टिव्हीवर सामना पाहत बाबांना प्रोत्साहन देताना दिसली. (KXIP vs MI, IPL 2020: किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध रोहित शर्माने नोंदवला खास विक्रम; विराट कोहली, सुरेश रैनाच्या पंक्त्तीत सामील झाला मुंबई इंडियन्सचा 'हिटमॅन')

टॉस गमाबून पहिले फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने रोहितचे अर्धशतक, कीरोन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने किंग्स इलेव्हन पंजाबला 192 रनांचे टार्गेट दिले आहे. या दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रैना आणि रोहितने आता संयुक्तपणे दुसरे स्थान मिळवले आहे. रोहितने आजच्या सामन्यात 45 चेंडूत 70 धावांचा डाव खेळला. रोहितने आजच्या डावात 8 चौकार आणि 3 षटकार मारले.  सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने सार्वधिक 44 आयपीएल अर्धशतक केले आहेत. रोहितचा हा अर्धशतकी डाव अजून खास बनला जेव्हा मुंबई इंडियन्सने त्याची चिमुकली समायराचा फोटो शेअर केला. फोटोमध्ये 'हिटमॅन'ची लाडकी टीव्हीवर बाबांचा डाव पाहत खास सेलिब्रेशन करताना दिसली.

 

View this post on Instagram

 

When Daddy Ro leads from the front! 💙💙💙 . #OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #KXIPvMI @rohitsharma45 @ritssajdeh

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians) on

दुसरीकडे, मुंबई इंडियन्सकडून आजच्या सामन्यात रोहितऐवजी पोलार्ड आणि हार्दिकने मोलाची भूमिका बजावली. पोलार्ड आणि हार्दिकमधील अर्धशतकी भागीदारीने पंजाबच्या फलंदाजांपुढे मुंबईला 192 धावांचे आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. अखेरच्या 5 ओव्हरमध्ये मुंबईने 89 धावा लुटल्या. कीरोन पोलार्ड 47 आणि हार्दिक पांड्या 30 धावा करून नाबाद परतले.