IPL 2019: नाणेफेक जिंकून चेन्नईचा गोलंदाजी करण्याचा निर्णय; बंगळुरुला पहिला धक्का, कर्णधार विराट बाद

या सामन्याच्या निमित्ताने धोनी आणि विराट कोहली एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत.

विराट कोहली (File Photo)

इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2019)चा फिव्हर आजपासून सुरु झाला आहे. आयपीएलचा हा 12 मोसम असणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल्स चॅलेंजर बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याच्या निमित्ताने धोनी आणि विराट कोहली एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. खरी शर्यत रंगणार आहे ती कोहली आणि सुरेश रैना यांच्यात. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. उद्घाटन सामन्याची रक्कम भारतीय सुरक्षा दलांना देण्यात आली.

यावर्षी पहिल्यांदाच आयपीएलची सुरूवात मिलेट्री बँडच्या गजरात झाली. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर धोनीच्या चेन्नई आणि विराटच्या बंगळुरू यांच्या सामन्याआधी मद्रास रेजिमेंट बँडने वादन केले. दरम्यान सामन्याला कर्णधार विराट कोहली आणि पार्थिव पटेल यांच्या सावध खेळीने सुरुवात झाली. मात्र हरभजन सिंहच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात विराट कोहली रविंद्र जाडेजाच्या हाती झेल देऊन बाद झाला.

अशा प्रकारे आहेत टीम्स -

चेन्नई: अंबाती रायडू, शेन वॉटसन, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार / विकेट किपर), केदार जाधव, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, हरभजन सिंह, इमरान ताहिर.

बंगलोर: पार्थिव पटेल (विकेट किपर), विराट कोहली (कर्णधार), मोईन अली, एबी डिव्हिलीर्स, शिमोन हेटमेयर, शिवम दुबे, कॉलिन डी ग्रँडहोमे, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.

रने आयपीएल च्या प्रसारणाचे हक्क विकत घेतले असल्याने, हॉटस्टारवर याचे ऑनलाईन लाईव्ह  स्ट्रिमींग होणार आहे. हॉटस्टारचे अॅप आणि वेबसाईटवर तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. जिओ वापरकर्त्यांसाठी हॉटस्टार हे पूर्णतः फ्री आहे तर इतर लोकांना यासाठी माफक शुल्क भरावे लागणार आहे