India vs Afghanistan, CWC 2019: भुवनेश्वर कुमार 2 ते 3 सामन्यांमधून बाहेर, या गोलंदाजाला मिळू शकते संधी
भुवनेश्वर हा शिखर धवननंतर दुखापतग्रस्त झालेला भारताचा दुसरा खेळाडू आहे.
शिखर धवन (Shikhar Dhawan) ला दुखापत झाल्यावर भारतीय संघाला अजून एक मोठा झटका बसलेला आहे. पाकिस्तान (Pakistan) विरुद्धच्या सामन्यादरम्यान भारताचा जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) च्या डाव्या डाव्या पायाचा स्नायू दुखावला गेला. त्यामुळे भुवनेश्वर 2 ते 3 सामन्यांमधून बाहेर झाला आहे. भारताचा पुढील सामना अफगाणिस्तानशी 22जूनला साऊथहॅम्पटन (Southhampton) च्या हँपशायर बॉल (Hampshire Ball) (द रोझ बॉल The Rose Ball) क्रिकेट ग्राउंडमध्ये होईल. या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्याची शक्यता आहे. (ICC Cricket World Cup 2019: टीम इंडिया मधील 'हा' सलामीवीर बनू शकतो 'मॅन ऑफ द टूर्नामेंट')
सूत्रांच्या माहिती प्रमाणे, भुवनेश्वर कुमारच्या जागी भारतीय संघात मोहम्मद शमी (Mohammed Shami) ची वर्णी लागू शकते. पाकिस्तानी विरुद्ध सामान्य दरम्यान, भुवनेश्वर ला दुखापतीमुळे खेळ मधेच सोडून पॅव्हिलिअन ला परतावे लागले होते. भुवनेश्वर हा शिखर धवननंतर दुखापतग्रस्त झालेला भारताचा दुसरा खेळाडू आहे.
भुवनेश्वर च्या खेळण्या बाबत कर्णधार विराट कोहली म्हणाला, भुवि अफगाणिस्तान (Afghanistan) आणि वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध होणाऱ्या सामन्यात अंतिम 11 मध्ये नसेल. मात्र 30 जूनला होणाऱ्या इंग्लंड (England) विरुद्धच्या सामन्यात त्याच्या संघात संवेशाबद्दल साशंकता आहे.