IND vs PAK, ICC World Cup 2019: भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटांची 60,000 रुपयांना पुन्हा विक्री
वेबसाइट, Viagogo, आता चाहत्यांकडून तिकिटे विकत घेते आणि त्यांची 20,000 ते 60,000 पर्यंतच्या किंमतींसाठी पुनर्विक्री करत आहे.
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) सामन्यावर पाणी फिरल्यानंतर चाहत्यांचे लक्ष लागलेय ते भारत-पाकिस्तान (Pakistan) या महामुकाबल्याकडे. या सामन्यात भारतीय खेळाडूंचा सर्वोत्तम कामगिरी करणार असल्याचा निर्धार कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) बोलून दाखवला. पाकिस्तान हा भारताचा परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी राहिला आहे आणि जगभरातील चाहत्यांनाही या सामन्याची उत्सुकता लपवता येत नाही. यंदा होणाऱ्या विश्वकप सामन्यासाठी सुद्धा चाहते उत्सुक असल्याचे दिसून येतंय. (India vs Pakistan: 'भारत सोबत क्रिकेट खेळायला भीक मागणार नाही, PCB प्रमुख एहसान मणी)
इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम (Old Trafford Stadium) वर हा सामना खेळाला जाईल. या सामन्याची तिकिटे सुद्धा, तिकीट खिडकी उघडण्याच्या काही तासांतच विकले गेले. आणि आता, ज्या लोकांनी तिकिटे विकत घेतली आहेत त्यांना पुन्हा विक्री करून अधिक कमाई करायची आहे. वेबसाइट, Viagogo, आता चाहत्यांकडून तिकिटे विकत घेते आणि त्यांची 20,000 ते 60,000 पर्यंतच्या किंमतींसाठी पुनर्विक्री करत आहे.
भारत-पाकिस्तान संन्यासाठचे प्लॅटिनम श्रेणीतील सर्वाधिक तिकीटाची किंमत 62, 610 रुपये तर सर्वात कमी म्हणजे कांस्य श्रेणीमध्ये 20,171 रुपये आहे.