IND vs PAK, World Cup 2019: Thanks to MS Dhoni! एम एस धोनीमुळे या पाकिस्तानी चाहत्याला निःशुल्क बघायला मिळणार भारत-पाकिस्तान सामना
भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) या सामन्यासाठी चाहते इतके उत्साही आहे कि या सामन्याची तिकिटे सुद्धा काही तासात विकली गेली.
यंदाच्या ICC World Cup 2019 मध्ये सर्वांचे लक्ष ज्या लढतीकडे लागून राहिले आहे ती भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील लढत 16 जूनला होणार आहे. या सामन्यासाठी चाहते इतके उत्साही आहे कि या सामन्याची तिकिटे सुद्धा काही तासात विकली गेली आणि आता एका वेबसाईटवरून तिकिटांची काळ्या बाजाराप्रमाणे विक्री होत असून त्यांची किंमत 17 हजारांपासून 60 हजार रुपयांपर्यंत आहे. तिकिटे संपल्याने काही चाहत्यांचे हा सामना मैदानात जाऊन बघण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले पण एक पाकिस्तानी चाहत्याला हा हायव्होल्टेज सामना निःशुल्क बघायला मिळणार आहे आणि ते केवळ भारताचा माजी कर्णधार हि एम एस धोनी (MS Dhoni) मुळे. (IND vs PAK, ICC World Cup 2019: भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटांची 60,000 रुपयांना पुन्हा विक्री)
दोन पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी संघातील या सामन्यासाठी पाकिस्तानचे बशीर चाचा (Bashir Chacha) 60 हजार किलोमीटरचा प्रवास करून इंग्लंडला (England) पोहोचले आहेत. ते धोनीचे मोठे चाहते आहेत. 2011 च्या वर्ल्ड कपपासून भारत-पाक यांच्यातील सामना पाहण्यासाठी बशीर हजार राहतात. धोनी आणि बशीर चाचा यांची 2011 पासून ओळख आहे. त्यावेळी मोहालीत पाकिस्तान विरुद्धच्या सेमीफायनलसाठी बशीर चाचांना धोनीने तिकीट मिळवून दिलं होतं. त्यानंतर आजपर्यंत भारत-पाक सामन्याचे तिकीट धोनीनेच त्यांना दिलं आहे.
बशीर चाचा म्हणतात की, मी मॅनचेस्टर (Manchester) ला पोहोचल्यावर पाहिलं की तिकिटासाठी लोकं 60 ते 70 हजार रुपये मोजण्यासाठी तयार आहे. एवढ्यात मी अमेरिकेला जाईन. मी धोनीचं आभार मानतो की त्याने मला तिकिटासाठी संघर्ष करायला लावला नाही.
हे कल्पना करण्यासारखी आहे की जिथे लोकं भारत-पाक सामन्याच्या तिकिटासाठी मोठी रक्कम मोजायला तयार आहे तिथे मला विनामूल्य तिकिट मिळतं. यावेळी मी धोनीसाठी एक भेट आणली आहे आणि मला आशा आहे की सामान्य नंतर मी त्याला ती देईन," असे बशीर म्हणाले.
गेले बरेच दिवस इंग्लंड ला पावसाने झोडपून काढलेलं आहे. हवामान खात्या अनुसार इंग्लंडमध्ये सर्वाधिक पाऊस हा मॅन्चेस्टर मध्ये पडलेला आहे. त्यामुळे भारत-पाक सामना होणार कि नाही यावर चाहत्यांचे लक्ष लागून आहे. याआधी भारत-न्यूझीलंड (New Zealand) सामना देखील पावसामुळे रद्द करण्यात आला होता ज्याने चाहत्यांची चांगलीच निराशा झाली होती.