IND vs PAK, ICC World Cup 2019: Accelerate, Like You Always Do! मुंबई पोलिसांचा Team India साठी महत्त्वाचा कानमंत्र

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना गमावल्यामुळं त्यांच्यावर हा सामना जिंकण्याचे आव्हान असेल.

(Photo Credits: Facebook)

मुंबई पोलीस (Mumbai Police) हे आपल्या ट्विटद्वारे नेहमीच चर्चेत राहता. आत्तापण असेच काहीसे आहे. भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) विश्वकप मधील सामन्याआधी मुंबई पोलिसांकडून भारतीय संघाला एक महत्वाचा सल्ला देण्यात आला आहे. पण नेहमी प्रमाणे हा सल्ला थोड्या पद्धतीने दिला गेलेला आहे. मुंबई पोलीस म्हणते, 'भारत, ग्रीन पहा? वेग वाढवा. जसे आपण नेहमी कारतो'. मुंबई पोलिसांचा हा सल्ला पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी देण्यात आलेला आहे. (IND vs PAK, ICC World Cup 2019: भारत व पाकिस्तान संघाच्या फॅन्सचं मँचेस्टर मध्ये सामन्यापूर्वी सेलिब्रेशन,भारताचा सुधीर आणि पाकिस्तानच्या चाचा यांनी एकत्र येऊन धरला ताल Watch Video)

भारत-पाकिस्तान विश्वकप मध्ये 6 सामने आले. शिवाय सर्व सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धीवरचा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. विश्वकप 2019 मध्ये भारतानं दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना नमवले आहे. मात्र, न्यूझीलंड विरोधातला सामना पावसामुळं रद्द झाला. त्यामुळं आजचा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे.

सलामीची जबाबदारी ही केएल राहुलवर असणार आहे. तर, चौथ्या क्रमांकावर कोण येतं हो पाहणं महत्त्वाच असेल. भारताचे गोलंदाजही सध्या चांगल्या फॉर्मामध्ये आहेत. दुसरीकडे पाकिस्तानी संघाची या स्पर्धेतली सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना गमावल्यामुळं त्यांच्यावर हा सामना जिंकण्याचे आव्हान असेल.