IND vs PAK, ICC World Cup 2019: भारतीय युट्युबर्स ने 'Wing Commander Abhinandan' च्या जाहिरातीला नवीन 'Mauka-Mauka' द्वारे दिले सडेतोड उत्तर, (Video)
पाकिस्तानने भारतीय वायू सेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या एका प्रतिमेचा वापर करुन केलेली जाहिरात भारतीयांना गळ्याखाली उतरली नाही.
यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सगळ्यांचं लक्ष भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) यांच्या मॅचवर लागलं आहे. भारत-पाकिस्तान मॅच म्हणलं की 'मौका-मौका' ची जाहिरात जरूरी आहे. यावेळीही विश्वकपच्या मॅचचं प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स (Star Sports) ने 'मौका-मौका'ची नवीन जाहिरात बनवली आहे. भारताच्या ‘मौका मौका‘ जाहिरातीने पाकिस्तानची सोशल मीडियावर चांगलीच नाचक्की केली. पण पाकिस्तानने भारतीय वायू सेनेचे विंग कमांडर अभिनंदन (Wing Commandar Abhinandan) यांच्या एका प्रतिमेचा वापर करुन केलेली जाहिरात भारतीयांना गळ्याखाली उतरली नाही आणि पाकिस्तानने अभिनंद चा अपमान केल्याची प्रतिक्रिया सोशल मीडिया वर होऊ लागली. (पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी चिडलेल्या पूनम पांडे ने काढला 'ब्रा'; 'Wing Commander Abhinandan'च्या जाहिरातीवर अशी दिली प्रतिक्रिया)
त्यामुळे आता अभिनंदनच्या अपमानाचा बदला म्हणून भारतीय युट्युब चॅनेल 'व्ही सेव्हन पित्तचर्स ('V Seven Pictures') ने एक 'मौका-मौका' ची जाहिरात तयार केली आहे. या जाहिरातीत अभिनंदन वर्धमान यांचा अपमान करून त्यांची खिल्ली उडवल्या बद्दल पाकिस्तान ला त्यांची जागा दाखवण्यात आली आहे.
दरम्यान, 16 जून रोजी मॅन्चेस्टर (Manchester) येथील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात रंगणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरही पावसाचे सावट आहे. आतापर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कपमध्ये 6 सामने खेळवले गेले आहेत. यातले 6 ही सामने भारताने जिंकत आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी वर रेकॉर्ड कायम ठेवला आहे.