IND vs ENG 3rd Test Day 1 Live Streaming: भारत-इंग्लंड संघातील पिंक-बॉल टेस्ट कुठे, कधी आणि कसे पाहणार? जाणून घ्या LIVE Streaming व TV Telecast बाबत सर्वकाही

अहमदाबादच्या या नवनिर्मित स्टेडियमवर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित केला जाणार आहे. दोन्ही संघातील तिसऱ्या पिंक-बॉल कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात.

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 3rd Test Day 1 Live Streaming: अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) भारत (India) आणि इंग्लंड (England) संघ पिंक-बॉल टेस्ट (Pink-Ball Test) सामन्यात आमने-सामने येतील. अहमदाबादच्या या नवनिर्मित स्टेडियमवर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित केला जाणार आहे. शिवाय, दोन्ही संघात पहिल्यांदा गुलाबी चेंडूने दिवस/रात्र कसोटी सामना खेळणार आहेत. यापूर्वी टीम इंडियाने (Team India) दोन तर इंग्लंडने तीन पिंक-बॉल टेस्ट सामने खेळले आहेत. दोन्ही संघातील तिसऱ्या पिंक-बॉल कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरु होईल तर टॉस अर्धातास पूर्वी म्हणजेच दुपारी 2:00 वाजता होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात तर सामन्याचं ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असेल. (IND vs ENG 3rd Test: तिसऱ्या टेस्ट मॅचपूर्वी विराट कोहलीची इंग्लंडला चेतावणी, म्हणाला- 'इंग्लंडमध्येही कमकुवतपणा, आमचे गोलंदाज भारी पडतील')

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेली चार सामन्यांची कसोटी मालिकेने आता रंजक वळण घेतले आहे. तब्बल एक वर्ष आणि तीन महिन्यांनंतर भारतीय संघ पुन्हा एकदा घरच्या मैदानावर डे नाईट कसोटी सामन्यात खेळणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर बांग्लादेशविरुद्ध भारताने प्रथम गुलाबी चेंडूने दिवस/रात्र कसोटी खेळली होती. आणि आता टीम इंडिया दुसर्‍या डे/नाईट टेस्टमध्ये इंग्लंडविरुद्ध जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये उतरेल. चार सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. अखेरच्या सामन्यात दमदार खेळ करत भारताने मालिकेत पुनरागमन केले, पण या सामन्यात पाहुण्या संघाचा वरचष्मा असू शकतो असे दिग्गजांचे मत आहे. दोन्ही संघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सामना जिंकणे गरजेचे आहेत.

असा आहे भारत आणि इंग्लंडचा संघ

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड: जो रूट (कॅप्टन), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, झॅक क्रॉली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, डोम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, क्रिस वोक्स आणि मार्क वुड.