India Vs Australia 3rd Test: 'Zero' चित्रपटाच्या प्रमोशनपेक्षा संघाकडे लक्ष द्या, नेटकऱ्यांचा Virat Kohli'ला सल्ला

नेटकऱ्यांनी विराटच्या या गोष्टीची खिल्ली उडवत त्याला संघातील झीरो असणाऱ्या खेळाडूकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

Anushka Sharma | Virat Kohli (photo credits: Twitter/Virat Kohli)

India Vs Australia 3rd Test:  मेलबर्न (Melbourne) येथे होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा(Anushka Sharma)सोबत Zeroचं प्रमोशन करण्यास गेला. मात्र नेटकऱ्यांनी विराटच्या या गोष्टीची  खिल्ली उडवत त्याला संघातील झीरो असणाऱ्या खेळाडूकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

विराट हा नुकताच अनुष्काचा नवा प्रदर्शित झालेला चित्रपट  झीरो(Zero) पाहण्यासाठी गेला होता. चित्रपट पाहून झाल्यानंतर त्याने सर्व कलाकारांसोबत विशेष असे अनुष्काचे कौतुक केले. तर कोहलीने या चित्रपटाबद्दल ट्विट करुन असे लिहिले की, 'झीरो हा मनोरंजनात्मक चित्रपट आहे. मी खूप आनंद घेतला. तर सर्व कलाकारांनी खूप सुंदर असे काम केले आहे. तरीही अनुष्काची झीरो मधील भूमिका ही आव्हानात्मक असली तरीसुद्धा तिने चांगल्या पद्धतीने निभावली आहे'.

विराटचे पती प्रेम यावेळी खूपच उफाळून आले.परंतु प्रेक्षकांकडून या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया देण्यात आल्या आहे. तरीही विराटच्या या ट्विटवरुन नेटकऱ्यांनी त्याला संघातील झीरो म्हणजेच लोकेश राहुल (Lokesh Rahul) याच्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर विराटची खिल्लीही सोशल मिडियावर उडविली जात आहे.