IND vs PAK, ICC World Cup 2019: मॅन्चेस्टर Pitch शी सरफराज अहमद नाखुश, भारताला अनुकूल खेळपट्टी बनवल्याचा आरोप

यंदाच्या विश्वकप मध्ये सरफराज पाकिस्तानी संघाला मिळणाऱ्या खेळपट्ट्यांवर नाराज आहे.

(Image Source/PTI)

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) मधील क्रिकेट चा हायव्होल्टेज सामना रविवारी 16 जूनला मँचेस्टर (Manchester) येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियम (Old Trafford Stadium) मध्ये खेळाला जाईल. मात्र या मॅचआधीच पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed)  याने रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. आयसीसी (ICC) ने भारतीय संघाला अनुकूल अशी खेळपट्टी बनवल्याचा आरोप सरफराज ने केला आहे. (IND vs PAK, ICC World Cup 2019: भारत विरुद्धच्या सामान्य आधी कर्णधार सर्फराज अहमदची खेळाडूंना चेतावनी)

यंदाच्या विश्वकप मध्ये सरफराज पाकिस्तानी संघाला मिळणाऱ्या खेळपट्ट्यांवर नाराज आहे. सर्फराज म्हणाला कि, 'आम्हाला मिळणाऱ्या खेळपट्ट्या खेळासाठी अनुकूल नसतात'. तर आयसीसी ने भारतीय संघाला प्रत्येकवेळी फलंदाजी आणि स्पिन गोलंदाजी ला मदत मिळणाऱ्या खेळपट्ट्या दिल्या जातात. अशा खेळपट्ट्या आशियाई संघाना अनुकूल असतात, अशी तक्रार सरफराज ने केली आहे.

सर्फराज ने या आधी ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध झालेल्या सामान्य मधल्या खेळपट्टीवरही आक्षेप घेतले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा ४१ धावांनी पराभव झाला. सध्या ICC गुणतालिकेत, पाकिस्तानी संघ तीन गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे, तर भारत पाच गन घेऊन तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने अजून पैकी ४ सामने खेळले आहे त्यापैकी त्यांनी १ सामना जिंकला, तर २ गमावले आहेत आणि १ सामना पावसामुळे रद्द झाला आहे. दुसरीकडे, भारतीय संघाने ३ पैकी २ मॅच जिंकल्या आहेत, तर १ सामना पावसामुळे रद्द झाला आहे.