ICC World Cup 2019: NZ vs SA मॅचदरम्यान इम्रान ताहीर ला अॅलन डोनाल्डजा हा विक्रम मोडण्याची संधी

आजच्या सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेकडे 2015 च्या उपांत्य लढतीत झालेल्या पराभव बदला घेण्याची संधी आहे.

(Photo Credit: Getty Image)
यंदाचा आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये काही नवीन रेकॉर्ड बनवले जात आहे तर काही जुने मोडीत काढले जातायत. आजच्या न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) सामन्यांदरम्यानही एक जुना रेकॉर्ड मोडत नवीन विक्रमाची नोंद केली जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यादरम्यान आफ्रिकेच्या इम्रान ताहीर (Imran Tahir) ला देशासाठी विश्वकप मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनण्याची संधी आहे. देशासाठी विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बेण्यासाठी ताहीरला केवळ दोन विकेटची आवश्यकता आहे.
यंदाच्या विश्वकप मध्ये ताहीर ने 5 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहे. शिवाय ताहिरने आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेत 37 विकेट्स घेतल्या आहेत तर अॅलन डोनाल्ड (Alan Donald) च्या विश्वकप करिअरमध्ये 25 सामन्यात 38 विकेट्स आहेत.
दरम्यान, आजच्या सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेकडे 2015 च्या उपांत्य लढतीत झालेल्या पराभव बदला घेण्याची संधी आहे. दुसरीकडे न्यूझीलंड संघ ICC गुणतालिकेत शीर्षस्थानाही आपली जागा पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिके मधील साखळी सामना बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबस्टन (Edgbaston) येथे खेळाला जाईल.