PAK vs AUS, ICC World Cup 2019: सर्फराज अहमदची भारतीय चाहत्यांवर टीका, 'मला नाही वाटत पाकिस्तानी चाहते स्मिथ आणि वॉर्नरला हूट करतील'

ते क्रिकेटवर आणि खेळाडूंवर प्रेम करतात.'

India vs Pakistan Match (Photo Credits-PTI)

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) पुन्हा एकदा वर्ल्ड कपच्या  निमित्तानी एकमेकांच्या आमने-सामने येतील. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा रविवारी, 16 जूनला मॅन्चेस्टर क्रिकेट मैदानात खेळाला जाईल. मात्र या सामन्यापूर्वी पाकिस्तानि कर्णधार सर्फराज अहमदने (Sarfraz Ahmad) भारतीय चाहत्यांवर निशाणा साधला आहे. सर्फराजला जेव्हा विचारण्यात आले की, पाकिस्तानी चाहते जर स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि डेव्हिड वॉर्नरला (David Warner) हूटिंग करू लागले तर तु विराट कोहलीसारखे करशील का? ह्यावर सर्फराजने म्हणाला, 'मला नाही वाटत पाकिस्तानी चाहते असं काही करतील. ते क्रिकेटवर आणि खेळाडूंवर प्रेम करतात.' (IND vs PAK, ICC Cricket World Cup 2019: भारत-पाकिस्तान सामना रद्द होऊ शकतो, हे असू शकते कारण)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध झालेल्या सामान्य दरम्यान भारतीय  प्रेक्षकांनी स्मिथला चीटर चीटर म्हणून चिडवायला सुरूवात केली. असं करताच भारताचा कर्णधार विराट कोहलीने प्रेक्षकांना थांबवलं आणि असं म्हणू नका सांगताना कोहलीने चाहत्यांच्यावतीने स्मीथची माफीही मागितली.

आपल्या पुढील सामन्यात, पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलिया संघाशी होईल. ह्याआधी पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध 7 विकेटने पराभव पत्करावा लागला होता, तर लंकेविरुद्धच्या सामन्यावर पावसाने पाणी फेरले यामुळे दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला होता.ऑस्ट्रेलियाने आपले पहिले दोन्ही सामने जिंकले असून, भारत विरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.