ICC World Cup 2019: ENG vs AFG मॅच आधी भांडणात अडकले अफगाण संघातील अज्ञात सदस्य, चौकशी सुरु
अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबाद्दीन नाईब यांनी सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या आरोपाविषयी मला कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
यंदाच्या विश्वकपमध्ये आपल्या सलग पाचव्या पराभवाला सामोरे जाण्याआधी अफगाणिस्तान (Afghanistan) संघ एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत राहिला. बीबीसी (BBC) च्या म्हणण्यानुसार मंगळवारी ओल्ड ट्रॅफर्ड मैदाना (Old Trafford) वर झालेल्या इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वीच्या रात्री मॅन्चेस्टर (Manchester) मधील एका रेस्टॉरंटमध्ये अफगाणिस्तान संघातील काही अज्ञात सदस्यांचं काही लोकांशी विवाद झाले. असे सांगण्यात येत आहे की, संघातल्या अज्ञात सदस्याने लोकांना सार्वजनिक ठिकाणी आपले फोटो काढण्यास मनाई केली आणि त्याला जाब विचारले. त्यानंतर वाद चिघळत गेला आणि शेवटी पोलिसांना बोलावण्यात आले.(India vs Afghanistan, CWC 2019: भुवनेश्वर कुमार 2 ते 3 सामन्यांमधून बाहेर, या गोलंदाजाला मिळू शकते संधी)
मात्र, अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबाद्दीन नाईब (Gulbadin Naib) यांनी सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या आरोपाविषयी मला कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
"17 जून 201 9 रोजी सकाळी 11.15 वाजता, मॅन्चेस्टरमधील लिव्हरपूल (Liverpool) रोडच्या परिसर येथे झालेल्या भांडणाविषयी पोलिसांना फोन आला," असे पोलीस आपली विधानात म्हणाले.
"अधिकारी तेथे उपस्थित होते. भांडणात कोणीही जखमी झाले नाही आणि संध्या कोणतीही अटक करण्यात आलेली नाही. शिवाय आमची चौकशी चालू आहे."
इंग्लंड (England) -अफगाणिस्तान मॅचही अत्यंत रोमांचक होती. इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गन (Eoin Morgan) ने तर षटकारांचा पाऊसच पडला. मॉर्गनने चक्क 71 चेंडूत 148 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 17 षटकारांचा समावेश होता. अफगाणिस्तानच्या राशिद खान (Rashid Khan) ची सर्वोत्तम स्पिनरपैकी एक म्हणून ओळख आहे. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये तर राशिदच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. इंग्लंडच्या बॅट्समननी राशिदच्या गोलंदाजीवर तब्बल ११ षटकार लगावले. राशिदने 9 ओव्हरमध्ये 110 रन दिले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)