इंग्लंड कर्णधार इयॉन मॉर्गन अडकला विवाहबंधनात

इंग्लड क्रिकेट संघातील वन डे कर्णधार इयॉन मॉर्गन विवाहबंधनात अडकला आहे.

इयॉन मॉर्गन विवाह (फोटो सौजन्य- ट्विटर)

इंग्लड क्रिकेट संघातील वन डे कर्णधार इयॉन मॉर्गन विवाहबंधनात अडकला आहे. तसेच गेल्या आठ वर्षांपासून तारा हिच्या सोबत इयॉनचे प्रेमसंबंध होते.
सॉमरसेट येथील एका ऐतिहासिक बॅबिंग्टन हाऊसमध्ये शनिवारी इयॉन आणि तारा यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. तर या विवाहसोहळ्यासाठी ब्रँडन मॅक्युलम, जेसन रॉय, बटलर आणि अॅलिस्टर कूक यांनी उपस्थिती लावली होती. तर इयॉनची बायको तारा ही मार्केटिंग को- ऑरडिनेटर म्हणून बरबेरी येथील फॅशन हाऊसमध्ये काम करते.

इयॉन मॉर्गन आणि तारा हे दोघे 2010 मध्ये एकमेकांना भेटले. त्यांतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध जूळून आल्यानंतर आठ वर्षांनी या दोघांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.