Arjuna Award 2020: क्रिकेटर इशांत शर्मा आणि धनुर्धारी अतनु दास यांच्यासह 29 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड समितीने गठित करण्याता आली आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज आणि धनुर्धारी अतानू दास यांच्यासह भारतीय 29 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी (Arjuna Award 2020) शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड समितीने गठित करण्याता आली आहे. या यादीत महिला हॉकी संघाची खेळाडू दीपिका ठाकूर, क्रिकेटर दीपक हुड्डा, आणि टेनिट खेळाडू दिविज शरण यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच भारतीय क्रिकेट संघाचा उप- कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा याची ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिस चॅम्पियन मनिका बत्रा, पॅरालिम्पिक चॅम्पियन मरियप्पन थांगावेलू यांचीही शिफारस ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्कारासाठी केली गेली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा 31 वर्षीय वेगवान गोलंदाज इशांत शर्माने आतापर्यंत 97 कसोटी आणि 80 एकदिवसीय सामन्यांमध्ये 400 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. महत्वाचे म्हणजे ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकणारी साक्षी मलिक यांचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. माजी भारतीय महिला वेटलिफ्टर आणि विश्वविजेत्या मीराबाई चानू यांचीही अर्जुन पुरस्कारासाठी समितीने निवड केली आहे, परंतु त्यांना हा पुरस्कार देण्यात येईल की नाही? याचा निर्णय क्रिडामंत्री किरण रिजिजू यांच्याकडे सोपण्यात आला आहे. कारण, यापूर्वी त्यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते. हे देखील वाचा- ICC Test Rankings: बाबर आझमची टॉप-5 मध्ये एंट्री; स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन यांना रँकिंगमध्ये फायदा, जसप्रीत बुमराहची 9 व्या स्थानी घसरण
पीटीआयचे ट्वीट-
साक्षी मलिकला रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल 2016 मध्ये खेलरत्न पुरस्कार मिळाला होता, तर मीराबाई चानू यांना 2018 मध्ये खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याच वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यालाही हा पुरस्कार मिळाला होता.