Zimbabwe vs Afghanistan, 3rd T20I Match 2024 Live Toss Update: तिसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग XI
दरम्यान, तिसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने (Rashid Khan) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team, 3rd T20 Match 2024 Live Toss Update: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 (T20 Series)मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज म्हणजेच 14 डिसेंबर रोजी खेळवला जात आहे. उभय संघांमधील हा सामना हरारे (Harare) येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये (Harare Sports Club) खेळला जात आहे. दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा 50 धावांनी पराभव केला. यासह आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान सिकंदर रझाकडे (Sikandar Raza) आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व राशिद खान करत आहे. दरम्यान, तिसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने (Rashid Khan) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - ZIM vs AFG 3rd T20I 2024 Live Streaming: शेवटच्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तान-झिम्बाब्वे मध्ये होणार चुरशीची लढत, विजेता संघ करणार मालिकेवर कब्जा; जाणून घ्या तुम्ही कुठे पाहणार थेट प्रक्षेपण)
पाहा पोस्ट -
पाहा दोन्ही संघ
झिम्बाब्वे: ब्रायन बेनेट, तदिवनाशे मारुमणी (विकेटकीपर), डिओन मायर्स, वेस्ली माधवेरे, अलेक्झांडर रझा (कर्णधार), ताशिंगा मुसेकिवा, वेलिंग्टन मसाकादझा, फराज अक्रम, रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझाराबानी, ट्रेव्हर ग्वांडू.
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, झुबैद अकबरी, दरविश रसूली, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान (कर्णधार), मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.