Yuvraj Singh Challenges Jasprit Bumrah: ‘तू किमान 'इतक्या' विकेट्स तरी घे’, जिमी अँडरसनच्या 600 टेस्ट विकेटनंतर युवराज सिंहचे जसप्रीत बुमराहला चॅलेंज
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन अँडरसन टेस्ट इतिहासात 600 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह सोशल मीडियावर अँडरसनचे कौतुक केले. त्याच्या या ट्विटवर भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंहने ट्विट करत त्याला एक चॅलेंज दिलं.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) मंगळवारी पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) अखेरच्या कसोटी सामन्यात अशक्य असा टप्पा गाठला. अँडरसन टेस्ट इतिहासात 600 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला. एकूणच ही कामगिरी करणारा तो चौथा गोलंदाज आहे. अनिल कुंबळेने 619 विकेट, शेन वॉर्न 708 विकेट आणि मुथिय्या मुरलीधरन 800 विकेट्स घेतल्या आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह (Jasprit Bumrah) सोशल मीडियावर अँडरसनचे कौतुक आणि अभिनंदन करणारे संदेश देण्यात आले. बुमराहने लिहिले, “तुमच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन, जिमी अँडरसन! आपली उत्कटता, धैर्य आणि ड्राईव्ह अपवादात्मक आहेत. भविष्यासाठी शुभेच्छा. #600टेस्टविकेट." त्याच्या या ट्विटवर भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंहने (Yuvraj Singh) ट्विट करत त्याला एक चॅलेंज दिलं. (ENG vs PAK 3rd Test: इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा गाठला; सचिन तेंडूलकर, विराट कोहली, अनिल कुंबले यांच्यासह क्रीडाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव)
बुमराहसमोर नवीन चॅलेंज देत युवी म्हणाला, “तुझे लक्ष्य आहे किमान 400 कसोटी विकेट.” दुसरीकडे, युवरानेदेखील अँडरसनचे ट्विट करत कौतुक केले. “माझ्या आयुष्यात वेगवान गोलंदाजाला 600 कसोटी विकेट घेताना पाहीन असे मला वाटले नव्हते! त्याने फक्त प्रमाण नाही तर गुणवत्ता दाखवली ज्याच्या आधारे त्याने गोलंदाजी केली - मग ती स्लो किंवा वेगवान विकेट, बाऊन्स किंवा बाउन्स नसो, वेगवान किंवा वेगवान नसो, त्याच्यासाठी परिस्थिती कधीही फरक पडला नाही! सर जिमी अँडरसन तुम्ही GOAT आहात,” त्याने लिहिले.
अँडरसनसाठी युवराजचे ट्विट
साउथॅम्प्टन कसोटीच्या अखेरच्या दिवशी पावसामुळे दोन सत्र वाया गेली ज्यामुळे अँडरसनला 600व्या विकेटसाठी खूप वाट पाहावी लागली. पाऊस थांबल्यानंतर शेवटच्या सत्रात खेळ सुरू झाला आणि अँडरसनने एका उसळत्या चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला झेलबाद केले. चेंडू अझर अलीच्या बॅटला लागला आणि जो रूटने स्लिपमध्ये त्याचा झेल टिपला. दरम्यान, बुमराहने आजवर 14 टेस्ट सामन्यात 20.3 च्या सरासरीने त्याने 68 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 64 वनडे सामने देखील खेळले आहेत ज्यात त्याने 24.4 च्या सरासरीने 104, तर 50 टी-20 मध्ये त्याने 59 विकेट्स घेतल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)