युवराज सिंगने खरेदी केली BMW G 310 R ; पाहा काय आहेत दमदार फिचर्स आणि किंमत
बाईक्सचे वेड असलेल्या युवराज सिंगच्या बाईक कलेक्शनमध्ये अजून एका बाईकची भर पडली आहे. कारण त्याने नुकतीच एक नवीकोरी बाईक खरेदी केली आहे.

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंगला क्रिकेटव्यतिरिक्त गाड्यांचेही प्रचंड वेड आहे. यामुळेच त्याच्याकडे कार्ससोबतच जबरदस्त बाईक्सचे कलेक्शन आहे. युवराजच्या या कलेक्शनमध्ये अजून एका बाईकची भर पडली आहे. अलिकडेच लॉन्च झालेली BMWG310 ही बाईक युवराजने खरेदी केली आहे. या बाईकची एक्स शो रुम किंमत 2.99 लाख रुपये आहे. BMW G 310 R ही स्ट्रीटफायटर बाईक असून कंपनीची सर्वात स्वस्त अॅडव्हेंचर बाईक आहे.
युवराजच्या बाईक्स
म शिवाय युवराज सिंगकडे BMW X6 M, Audi Q5, BMW 3 Series, Bentley Continental Flying Spur यांसारख्या महागड्या बाईक्स आहेत. त्याचबरोबर काही वर्षांपूर्वीच युवराजने Lamborghini Murcielago देखील खरेदी केली होती. याशिवाय युवराजकडे E46 BMW M3 कन्वर्टिबल कार आहे.
बाईकचे फिचर्स
- बाईकमध्ये 313 CC चे इंजिन असून ते 34 bhp पावर आणि 28 Nm चे टॉर्क जनरेट करेल. इंजिनमध्ये 6 स्पीड गियरबॉक्स दिलेला आहे.
- याशिवाय बाईकमध्ये स्टॅंडर्ड डुअल चॅनल एबीएस (ABS)दिले आहे. G 310 R मध्ये 17 इंचाचे अलॉय व्हील आहेत.
- बाईकचा टॉप स्पीड 143 किलोमीटर प्रती तास आहे. BMW G 310 R मध्ये 11 लीटरची टॅंक आहे. याचे व्हील बेस 1,380 एमएम आहे. बाईकमध्ये सर्व लॉकसाठी एकच चावी आहे.
या बाईकचा लूक भन्नाट असून युवराज सिंगच्या पर्सनालिटीला तो अत्यंत साजेसा आहे.
BMW चा नवा प्लॅन
BMW ने G 310 भारतात लॉन्च करण्यापूर्वी देशातील नेटवर्क वाढवले. आता भारतात कंपनीच्या 7 डीलरशिप आहेत. दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, बंगळूरु, अहमदाबाद आणि कोची येथे डीलरशिप शो रुम्स आहेत. लवकरच चंदीगड आणि कोलकतामध्येही डीलरशिप शो रुम्स सुरु करण्याचा कंपनीचा मानस आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)