World Test Championship Highest Run-Scorers: बाबर आझमची फलंदाजी सरासरी सर्वाधिक, विराट कोहलीलाही पछाडले; पाहा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप मधील टॉप-10 फलंदाज
तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर इंग्लंडने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. पहिल्या 10 फलंदाजांमध्ये बाबर आझमची सरासरी सर्वाधिक आहे. बाबरची सरासरी 86.12 असून विराट कोहलीची 52.25 आहे.
पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने (England) रोमहर्षक पद्धतीने विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर इंग्लंडने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) टेबलमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. क्रिस वोक्स आणि जोस बटलर यांच्या नाबाद 84 आणि 75 धावांच्या शानदार खेळीमुळे यजमानांना पाकिस्तानविरुद्ध 3 विकेटने विजयची चव चाखली. पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर इंग्लंड 266 गुणांसह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये तिसर्या स्थानावर आहे. भारत 360 गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर ऑस्ट्रेलिया 296 गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. फलंदाजांच्या क्रमवारीतही बदल पाहायला मिळाले. बाबर आझमने (Babar Azam) टॉप-10 मध्ये एंट्री केली असून भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) पुढे निघाला आहे. शिवाय, पहिल्या 10 फलंदाजांमध्ये बाबरची सरासरी सर्वाधिक आहे. बाबरची सरासरी 86.12 असून विराटची 52.25 आहे. (ENG vs PAK 1st Test: बाबर आझमने जडले शानदार अर्धशतक; विराट कोहली असता तर सर्वांनी केली असती चर्चा म्हणत नासिर हुसैन यांनी दिली प्रतिक्रिया)
मात्र, इंग्लंडचा कर्णधार जो रूटची फलंदाजी सरासरी सर्वात कमी 37.63 इतकी आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबूशेनची फलंदाजी सरासरी दुसरी सर्वाधिक 83.26 आहे. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टॉप-10 फलंदाजांमध्ये लाबूशेन 1,249 धावांश अव्वल क्रमांकावर आहे तर बाबर 689 धावांसह नवव्या स्थानावर आहे. बाबरने ओल्ड ट्रॅफर्ड येथील सामन्याच्या पहिल्या डावात 69 तर दुसऱ्या डावात फक्त 5 धावा केल्या. टॉप-१० फलंदाजांमध्ये टीम इंडियाच्या ३ खेळाडूंचा समावेश आहे. मयंक अग्रवाल 779 धावांसह 5व्या, अजिंक्य रहाणे 715 धावांसह 8 व्या तर कॅप्टन कोहली 627 धावांसह दहाव्या स्थानावर आहे.
दरम्यान, पाकिस्तानवर 3 विकेटने विजयी इंग्लंडचा संघ आता दुसर्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघापासून अवघ्या 30 गुणांनी पिछाडीवर आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडने सलग तिसरा विजय नोंदविला. पाकिस्तानविरुद्ध मालिकेतील आणखी एक विजय इंग्लंडला अव्वल 2 मध्ये नेऊ शकेल. न्यूझीलंड चौथ्या, तर पाकिस्तान सहा सामन्यांत 140 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. पण, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत इंग्लंडविरुद्ध सलग दोन विजयांसह न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी अझर अलीचा संघ उत्सुक असेल.