World Cup Final अंपायर कुमार धर्मसेनांनी स्वीकारली ओव्हर थ्रो निर्णयाची चूक, पण माफी मागण्यास दिला नकार

धर्मसेना यांनी त्यांचा निर्णय चुकीचा असल्याचे मान्य केले असले तरी त्यावर माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे.

कुमार धर्मसेनांनी (Photo Credit: Kumar Dharmasena/ Twitter)

इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात खेळण्यात आलेला आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक फायनल अनेक कारणांसाठी लक्षात राहण्यासारखा आहे. साखळी साम्याप्रमाणेच फायनलमध्ये देखील अंपायरांच्या एका निर्णयामुळे पूर्ण सामनाच पलटला. शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंचा अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) दोन धावा घेत असताना चेंडू त्याच्या बॅटला लागला आणि सीमारेषेकडे गेला. त्यानंतर अंपायरनी इंग्लंडला 6 धावा दिल्या. या निर्णयामुळे अखेरच्या चेंडूवर इंग्लंडने एक धाव घेत सामना बरोबरीत सोडवला आणि त्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. अंतिम सामन्यात अंपायरांच्या खराब कामगिरीवर अनेकांनी टीका केली. विश्वचषक अंतिम सामन्यात ज्या अंपायरांनी हा निर्णय दिला होता, ते श्रीलंकाचे अंपायर कुमार धर्मसेना (Kumar Dharmasena). (IND Vs WI: वेस्ट इंडिज दौ-यासाठी भारतीय संघ जाहीर, विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मध्ये कोणाला मिळाली संधी)

विश्वचषक उलटून दहा दिवस झाले आणि अखेरीस धर्मसेन यांनी आपल्या त्या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. धर्मसेना यांनी त्यांचा निर्णय चुकीचा असल्याचे मान्य केले असले तरी त्यावर माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे. संडे टाईम्स (Sunday Times) या वृत्तपत्राशी बोलताना धर्मसेना म्हणाले की, "माझा तो निर्णय चुकीचा होता. मी टीव्ही रिप्लेवर पाहिल्यानंतर ही गोष्ट माझ्या लक्षात आली. पण मैदानात आमच्याकडे टीव्ही रिप्ले पाहण्याची सुविधा नसते. त्यामुळे मी दिलेल्या निर्णयावर वाईट वाटत नाही. मी त्यावेळी जो निर्णय दिला होता त्यावर आयसीसीने माझे कौतुक केले आहे." दरम्यान, धर्मसेना यांच्या त्या निर्णयामुळे इंग्लंडला सामना बरोबरीत करण्याची संधी मिळाली. सुपर ओव्हर देखील टाय झाल्यामुळे इंग्लंडने अधिक चौकाराच्या जोरावर बाजी मारली.

दुसरीकडे, धर्मसेना यांनी इंग्लंड-ऑस्ट्रेलिया (Australia) सेमीफायनल सामन्यात देखील चुकीचा निर्णय दिला होता. 20व्या ओव्हरमध्ये इंग्लंडच्या जेसन रॉय (Jason Roy) याला धर्मसेना यांनी बाद दिले होते. पण रिप्लेमध्ये रॉय बाद नसल्याचे आढळले. आणि त्यावेळी इंग्लंडकडे रिव्यू शिल्लक नसल्याने रॉयला मैदान सोडावे लागले आहे. धर्मसेनेच्या या निर्णयावर रॉयने वाद घातला त्यामुळे त्याला डिमेरिट गुण आणि 30 टक्के दंड थोढावण्यात आला. त्यानंतर धर्मसेना यांना वारंवार सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif