ENG vs NZ, World Cup 2019 Semi-Final मॅचआधी जेसन रॉय आणि अंपायर कुमार धर्मसेना यांची दिलजमाई, पहा वायरल (Photo)

रॉय आणि धर्मसेना यांच्यातील दिलजमाई सोशल मीडियावर हिट होत आहे.

जेसन रॉय आणि अंपायर कुमार धर्मसेना (Photo Credit: News Cricket/Twitter)

यजमान इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमधील अंतिम लढत लॉर्ड्स (Lords) मैदानावर सुरु आहे. विश्वचषकच्या इतिहासात 29 वर्षानंतर अशी फायनल होणार आहे ज्यातून क्रिकेटविश्वाला एक नवा विजेता मिळेल. या दोन्ही संघांनी आतापर्यंत विश्वचषक जिंकलेला नाही. पण, या सामन्याआधी इंग्लंडचा सलामीवर जेसन रॉय (Jason Roy) आणि अंपायर कुमार धर्मसेना (Kumar Dharmasena) एकमेकांशी चर्चा करताना दिसले. त्यानंतर रॉयने तर धर्मसेना यांना घट्ट मिठी मारलेली पाहायला मिळाली. रॉय आणि धर्मसेना यांच्यातील दिलजमाई सोशल मीडियावर हिट होत आहे.  (ENG vs NZ World Cup 2019 Final: महेला जयवर्धनेला मागे टाकत केन विलियमसन बनला एका विश्वचषकमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार)

यजमान इंग्लंडने सेमीफाइनलमध्ये ऑस्ट्रेलियाचे 224 धावांचे लक्ष्य 32.1 षटकांत 2 विकेट्सच्या राखत पूर्ण केले. या सामन्यातील रॉय हा स्टार खेळाडू ठरला. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई करून 65 चेंडूंत 85 धावा केल्या. रॉयने सलामीवीर जॉनी बेअरस्टो (Jonny Baistow) याच्यासाथीने 124 धावांची भागीदारी केली. पण, या सामन्यातील 20 व्या ओव्हरमध्ये पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या गोलंदाजीवर रॉयला चुकीच्या पद्धतीने बाद करण्यात आले. चेंडू व्हाईडच्या दिशेनं गेला होता आणि त्यावर रॉयने फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, बॅट आणि चेंडू यांच्यात काहीच संपर्क झाला नाही, तरीही ऑसी खेळाडूंनी अपील केलं. बऱ्याच वेळ अपील केल्यानंतर अंपायर कुमार धर्मसेनानि त्याला बाद ठरवले. त्यानंतर रॉयने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पण आता, अंतिम सामन्यापूर्वी रॉयने धर्मसेना यांची भेट घेत झालेल्या प्रकाराची माफी मागितली. रॉय आणि धर्मसेना यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे.

आजच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचे तर न्यूझीलंडने टॉस जिंकत पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. क्रिस वोक्स याने मार्टिन गप्टिल 19 धावांवर बाद करत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर केन विल्यम्सन आणि हेन्री निकोलस यांनी अर्धशतकी भागिदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरला पण लिअम प्लंकेट याने किवी संघाला एकामागोमाग दोन झटके दिले. प्लंकेटने विल्यम्सन आणि निकोलस याना माघारी



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif