SPN vs VEL, Women's T20 Challenge 2020: मिताली राजने जिंकला टॉस; वेलॉसिटीचा पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय
आजच्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मिताली राजने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेतील आजचा पहिला सामना असल्याने दोन्ही संघ विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असतील.
Women's T20 Challenge 2020: इंडियन प्रीमिअर लीग पाठोपाठ आजपासून महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेची देखील सुरुवात होत आहे. महिला टी-20 चॅलेंज (Women's T20 Challenge) किंवा महिला आयपीएल (Women's IPL) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा पहिला सामना सुपरनोव्हास (Supernovas) आणि वेलॉसिटी (Velocity) यांच्यात खेळला जाईल. सुपरनोव्हासचे नेतृत्व पुन्हा हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) तर वेलॉसिटीचे नेतृत्व मिताली राज (Mithali Raj) करताना दिसेल. महिला टी-20 चे सर्व सामने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळले जातील. आजच्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मिताली राजने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेतील आजचा पहिला सामना असल्याने दोन्ही संघ विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असतील. तब्बल 8 महिन्यांनंतर पहिल्यांदा भारतीय महिला क्रिकेटर्स क्रिकेटच्या मैदानावर उतरतील. भारतीय महिला क्रिकेट टीमचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये झाला होता. (Women's T20 Challenge 2020 LIVE Streaming: सुपरनोव्हास आणि वेलॉसिटी यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
दरम्यान, दोन्ही संघांमध्ये मागील वर्षीचा अंतिम सामना झाला होता, ज्यात हरमनप्रीतच्या टीमने विजय मिळवला आणि विजेतेपद पटकावले होता. सुपरनोव्हासने आजवर दोन विजेतेपद जिंकले आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात सुपरनोव्हास टीमचे सलग तिसरे विजेतेपद जिंकण्यावर लक्ष असेल. मागील स्पर्धेत हरमनप्रीत उत्कृष्ट फॉर्ममध्ये होती. तिने तीनपैकी दोन सामन्यात अर्धशतके झळकावली, त्यामुळे भारताची टी-20 कर्णधार यंदा देखील आपल्या भव्य फॉर्मचे प्रदर्शन करण्यास सज्ज असेल.
पाहा आजच्या सामन्यासाठी सुपरनोव्हास आणि वेलॉसिटीचा प्लेइंग इलेव्हन
सुपरनोव्हास: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमीमाह रॉड्रिग्ज, चमारी अटापट्टू, तानिया भाटिया (विकेटकीपर), शशिकला सिरीवर्डेन, पूजा वस्त्रकर, राधा यादव, पूनम यादव, शकेरा सेलमन आणि आयबोंगा खाका.
वेलॉसिटी: मिताली राज (कॅप्टन), शाफाली वर्मा, डेनियल व्याट, वेदा कृष्णमूर्ती, सुषमा वर्मा, सुने ल्यूस, मनाली दक्षिणी, शिखा पांडे, एकता बिष्ट, लेघ कासपेरेक, जहानारा आलम.