SUP vs VEL, Women's T20 Challenge 2020 LIVE Streaming: सुपरनोव्हास आणि वेलॉसिटी यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
शारजाह क्रिकेट स्टेडियमवर महिला टी-20 चॅलेंजचे आयोजन होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हास आणि मिताली राजच्या वेलॉसिटी यांच्यात पहिला सामना खेळला जाईल. सुपरनोव्हास आणि वेलॉसिटी यांच्यातील आजचा महिला टी-20 चॅलेंज सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण भारतीय प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
SUP vs VEL, Women's T20 Challenge 2020 LIVE Streaming: इंडियन प्रीमिअर लीग 2020चा हांगाच्या अंतिम टप्प्यात पोहचला असताना आजपासून शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) महिला टी-20 चॅलेंजचे (Women's T20 Challenge) आयोजन होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) सुपरनोव्हास (Supernovas) आणि मिताली राजच्या (Mithali Raj) वेलॉसिटी (Velocity) यांच्यात पहिला सामना खेळला जाईल. जयपूर येथे गतवर्षीच्या अंतिम सामन्यात 15,000 प्रेक्षकांच्या उपस्थितीत दोन्ही संघात फायनलमध्ये टक्कर झाली होती. अखेरच्या चेंडूवरवर सुपरनोव्हासने विजय मिळवला होता. मार्च महिन्यात टी-20 वर्ल्ड कप फायनलनंतर आणि कोरोना व्हायरसमुळे मालिका स्थगित झाल्यानंतर भारतीय महिला पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे. दरम्यान, सुपरनोव्हास आणि वेलॉसिटी यांच्यातील आजचा महिला टी-20 चॅलेंज सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण भारतीय प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. सामना सायंकाळी 7:20 वाजता टॉस होणार आहे. तसेच Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. (Women’s T20 Challenge Schedule: महिला आयपीएलचे वेळापत्रक जाहीर; मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना करणार नेतृत्व, जाणून घ्या संपूर्ण शेड्युल)
हरमनप्रीतच्या सुपरनोव्हासने गेल्या दोन्ही हंगामात (2018, 2019) विजेतेपद जिंकले आहेत. यापूर्वी 2019 मध्ये दोन्ही संघ दोन वेळा आमने-सामने आले होते. लीग सामन्यात सुपरनोव्हासने वेलॉसिटीचा 12 धावांनी पराभव केला होता. तर, दोन संघांदरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात, सुपरनोव्हासने वेलॉसिटीविरुद्ध 4 गडी राखून विजय मिळविला होता.
पाहा सुपरनोव्हास आणि वेलॉसिटी संघ
सुपरनोव्हास: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमीमाह रॉड्रिग्ज, चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (विकेटकीपर), शशिकला सिरीवर्डेन, पूनम यादव, शकेरा सेलमन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकर, आयुषी सोनी, आयबोंगा खाका, मुस्कान मलिक.
वेलॉसिटी: मिताली राज (कॅप्टन), मिताली राज (कॅप्टन), शाफाली वर्मा, वेदा कृष्णमूर्ती, सुषमा वर्मा, एकता बिष्ट, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका वैद्य, सुश्री दिव्यदर्शिनी, मनाली दक्षिणी, लेघ कासपेरेक, डेनियल व्याट, सुने ल्यूस, जहानारा आलम, एम अनघा.
(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2020 03:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

