Women's IPL वर सौरव गांगुलीची मोठी घोषणा, BCCI 2023 मध्ये सुरू करणार संपूर्ण महिला आयपीएल; पाहा काय म्हणाले

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महिला इंडियन प्रीमियर लीग सुरू करण्याच्या शक्यतेबद्दल खुलासा करताना सांगितले की, 2023 ही पूर्ण महिला लीग सुरू करण्यासाठी खूप चांगली वेळ असेल जी पुरुषांच्या आयपीएल इतकी मोठी आणि भव्य असेल. BCCI महिला T20 चॅलेंजचे आयोजन करत आहे ज्यामध्ये 3 संघ स्पर्धेत सहभागी होतात.

ट्रेलब्लेझर महिला टी-20 चॅलेंज (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) भारतातील पुरुष क्रिकेटला उंचीवर नेण्यात आणि नवीन खेळाडूंची मजबूत खाण तयार करण्यात महत्त्वाची भूमिका आहे. गेल्या 14 वर्षात या लीगमधून अनेक खेळाडू उदयास आले आहेत ज्यांनी टीम इंडियात (Team India) आपले स्थान निर्माण केले आहे. अशा परिस्थितीत महिला आयपीएलची (Women's IPL) मागणीही बऱ्याच दिवसांपासून होत होती, मात्र बीसीसीआय (BCCI) वेगवेगळ्या कारणांमुळे ती पुढे ढकलत जात होती. आता बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआय 2023 पासून महिला आयपीएल (IPL) सुरू करण्याचा विचार करत असल्याचे गांगुलीने म्हटले आहे. महिला इंडियन प्रीमियर लीग (Women's Indian Premier League) सुरू करण्याच्या शक्यतेबद्दल गांगुलीने खुलासा केला आणि 2023 ही पूर्ण महिला लीग सुरू करण्यासाठी खूप चांगली वेळ असेल जी पुरुषांच्या आयपीएलइतकी मोठी आणि भव्य असेल असे म्हटले.

उल्लेखनीय म्हणजे BCCI महिला T20 चॅलेंजचे आयोजन करत आहे ज्यामध्ये 3 संघ सहभागी होतात. तथापि गेल्या वर्षी बीसीसीआयने कोविड-19 महामारीच्या काळात दोन भागांत आयपीएलचे आयोजन करूनही 2021 मध्ये महिला टी-2- चॅलेंजचे आयोजन केले नाही. मिताली राज, स्मृती मंधाना आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांसारख्या अनेक भारतीय महिला तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी महिला आयपीएल सुरु करण्याची मागणी करत आले आहेत. “आम्ही पूर्ण WIPL तयार करण्याच्या पातळीवर आहोत. ते नक्कीच होणार आहे. माझा ठाम विश्वास आहे की पुढच्या वर्षी म्हणजे 2023 संपूर्ण महिला आयपीएल सुरू करण्यासाठी खूप चांगला काळ असेल जो पुरुषांच्या आयपीएल इतकाच मोठा आणि भव्य असेल,” गांगुलीने पीटीआय वृत्तसंस्थेने सांगितले.

उल्लेखनीय बाब म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलिया महिला बिग बॅश लीगचे आयोजन करते, तर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने या वर्षाच्या सुरुवातीला पुरुषांच्या स्पर्धेबरोबरच महिला ‘हंड्रेड’चे आयोजन केले होते. दरम्यान लक्षात घ्यायचे की 2021 मध्ये ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये तब्बल आठ भारतीय महिला खेळाडूंनी भाग घेतला होता. दुसरीकडे, गांगुलीने मे महिन्यात आयपीएल 2022 च्या प्लेऑफ दरम्यान महिला T20 चॅलेंज आयोजित केले जाईल. सामने आणि ठिकाणे नंतर ठरवली जातील याची पुष्टी केली.



संबंधित बातम्या

ZIM vs AFG 1st ODI 2024 Preview: अफगाणिस्तान क्रिकेट संघ पहिल्या वनडेत झिम्बाब्वेशी भिडणार; सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील जाणून घ्या

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

Jasprit Bumrah Defends Mohammed Siraj: जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराजच्या समर्थनार्थ मैदानात उतरला, गोलंदाजाच्या खराब फॉर्मचा केला बचाव

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून