IND vs WI 2nd ODI 2023: दुसऱ्या वनडेत सूर्यकुमार यादवच्या जागी संजू सॅमसनला मिळणार संधी? जबरदस्त आहे रेकॉर्ड
सध्या सूर्यकुमार यादवचा (Surya Kumar Yadav) फॉर्म टीम इंडियासाठी मोठी समस्या आहे. मधल्या फळीत खेळताना सूर्यकुमार यादवची बॅट गेल्या काही डावांत शांत दिसत आहे.
सध्या टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 29 जुलै रोजी होणार आहे. केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे भारतीय वेळेनुसार 7 वाजता दोन्ही संघ खेळणार आहेत. सध्या सूर्यकुमार यादवचा (Surya Kumar Yadav) फॉर्म टीम इंडियासाठी मोठी समस्या आहे. मधल्या फळीत खेळताना सूर्यकुमार यादवची बॅट गेल्या काही डावांत शांत दिसत आहे. टीम इंडियाकडे सूर्यकुमार यादवला पर्याय म्हणून संजू सॅमसन (Sanju Samson) आहे, ज्याची गेल्या 10 डावांमध्ये फलंदाजीची सरासरी उत्कृष्ट राहिली आहे.
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात केवळ 19 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेत खेळल्या गेलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये त्याला खातेही उघडता आले नव्हते. सूर्यकुमार यादवने शेवटच्या 10 एकदिवसीय डावात नाबाद 34 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवचीही गेल्या 10 डावांमध्ये सरासरी केवळ 12.44 इतकीच आहे. (हे देखील वाचा: Virat Kohli Record: विराट कोहली विक्रमाच्या उंबरठ्यावर, भारत विरुद्ध वेस्ट इडिंज दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास)
दुसरीकडे, टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनची त्याच्या शेवटच्या 10 एकदिवसीय डावात सरासरी 66 आहे. यादरम्यान संजू सॅमसनच्या बॅटमधून 2 अर्धशतकांच्या खेळी झाल्या आहेत. यासह तो 5 वेळा नाबाद परतला आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना सूर्यकुमार यादवच्या संघातील स्थानाबाबत लवकरच मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे.
दुसऱ्या वनडेत सूर्यकुमार यादवच्या कामगिरीवर सर्वांचे असेल लक्ष
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजीत अवघ्या 19 धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. या संधीचा फायदा उठवण्यात सूर्यकुमार यादव यशस्वी झाला नाही, तर त्याला आशिया चषक आणि विश्वचषक संघात स्थान मिळवणे कठीण होऊ शकते.