Why is Rohit Sharma Unavailable for IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियामध्ये असूनही रोहित शर्मा MCG मधील 'बॉक्सिंग डे' टेस्ट साठी अनुपलब्ध, जाणून घ्या कारण

भारताच्या मर्यादित ओव्हरचा उपकर्णधार रोहित शर्मा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून विराटच्या जागी दुसऱ्या कसोटीसाठी त्याचा समावेश केला जाऊ शकणार नाही. अंतिम दोन टेस्ट सामन्यांसाठी भारतीय कसोटी संघात सामील केलेला रोहित शर्मा दुसऱ्या सामन्याच्या निवडीसाठी अनुपलब्ध असेल.

रोहित शर्मा (Photo Credits: BCCI-Twitter)

IND vs AUS 2nd Test at MCG: भारत (India) आणि यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) संघात 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामना खेळला जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) खेळला जाणार आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी उर्वरित तीन कसोटी सामन्यातून माघार घेतली असून तो लवकरच मायदेशी परतणार आहे. विराटच्या अनुपस्थिती उपकर्णधार अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करेल. आगामी दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी मागील प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल निश्चित मानले जात आहे. भारताच्या मर्यादित ओव्हरचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून विराटच्या जागी दुसऱ्या कसोटीसाठी त्याचा समावेश केला जाऊ शकणार नाही. अंतिम दोन टेस्ट सामन्यांसाठी भारतीय कसोटी संघात सामील केलेला रोहित शर्मा दुसऱ्या सामन्याच्या निवडीसाठी अनुपलब्ध असेल. (IND vs AUS 2nd Test: ‘बॉक्सिंग डे’ टेस्ट मॅचमध्ये भारतासाठी ‘हा’ खेळाडू ठरू शकतो मोठा ‘गेमचेंजर’, तर पृथ्वी शॉ याचा पत्ता कट होण्याची शक्यता)

आयपीएल दरम्यान झालेल्या हॅमस्ट्रिंग दुखापतवर नर्सिंग करणारा रोहित 16 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आणि कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटरला अन्य खेळाडूंसोबत सामील होण्यापूर्वी पुढील 14 दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. 29 डिसेंबर रोजी रोहितचा क्वारंटाइन कालावधी संपण्याची शक्यता आहे आणि तोपर्यंत भारत एमसीजीतील दुसर्‍या कसोटी सामन्यात लॉक होईल. आणि हेच कारण आहे की बॉक्सिंग डे टेस्टसाठी हिटमॅन अनुपलब्ध असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे आणि टी-20 मालिकेला मुकलेला रोहित सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील तिसऱ्या आणि ब्रिस्बेनच्या गब्बा येथील चौथ्या टेस्ट मॅचसाठी उपलब्ध असेल. भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी टेस्ट 7 जानेवारी तर चौथी टेस्ट 15 जानेवारीपासून खेळली जाईल. शिवाय, तिसऱ्या टेस्टमध्ये रोहित शर्माच्या खेळण्यापूर्वी त्याची आणखी एक फिटनेस टेस्ट घेतली जाईल त्यानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यावर निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा अ‍ॅडिलेड ओव्हल येथील पहिला सामना गमावल्यावर भारतीय संघ मालिकेत 0-1ने पिछाडीवर आहे. पहिल्या पिंक-बॉल टेस्टच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया फक्त 36 धावाच करू शकली, जी भारतीय संघाच्या टेस्ट इतिहासातील सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडे मेलबर्नमध्ये सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याची संधी आहे. डेविड वॉर्नर आणि सीन एबॉट संघात सामील होण्यासाठी रवाना झाले आहेत.



संबंधित बातम्या

IND vs AUS, 4th Test Pitch Report And Weather Update: चौथ्या कसोटीत टीम इंडियाचे फलंदाज की ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज वर्चस्व गाजवतील? सामन्यापूर्वी, मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती घ्या जाणून

South Africa vs Pakistan, 1st Test Match Live Streaming In India: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात पहिली कसोटी, जाणून घ्या भारतात कधी, कुठे आणि कसे लाइव्ह मॅचचा आनंद घेता येणार

Australia vs India, Boxing Day Test: टीम इंडिया मेलबर्नमध्ये विजयाची हॅट्ट्रिक करू शकेल का? बॉक्सिंग डे कसोटीत सर्वांच्या नजरा असणार या दिग्गज खेळाडूंवर

Virat Kohli Test Record Against Australia: कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची ऑस्ट्रेलियाविरुद्धची अशी आहे कामगिरी, 'रन मशीन'; च्या आकडेवारीवर एक नजर