RR Vs KXIP, IPL 2020: राजस्थान रॉयल विरुद्ध सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा पराभव का झाला? मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडूलकर यांनी दिले 'हे' कारण
नेट रनरेटच्या हिशोबाने दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्सपेक्षा सरस असल्याने दिल्ली अव्वल स्थानी आहे.
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील नवव्या सामन्यात राजस्थान रॉयलने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला (RR Vs KXIP) पराभूत केले आहे. पंजाबच्या संघाने प्रथम फलंदाजी करत दिलेल्या 224 धावांचे लक्ष्य राजस्थानच्या संघाने 4 गडी राखून पूर्ण केले आहे. यामुळे राजस्थानच्या संघावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. तसेच पंजाबच्या संघासाठी मोठी धाव संख्या उभी करण्यासाठी मोलाची वाटा उचणारे कर्णधार केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांची आक्रमक खेळी व्यर्थ ठरली आहे. दरम्यान, भारतीय संघाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंजाबच्या पराभवाचे कारण सांगितले आहे. तर, जाणून घेऊया पंजाबच्या पराभवबद्दल काय म्हणाले? सचिन तेंडूलकर.
शारजाचे मैदान छोटे असून पंजाबच्या एकाही गोलंदाजाने अखेरच्या षटकांत यॉर्कर चेंडूंचा मारा केला नाही. याचसोबत मुरगन आश्विनचाही खुबीने वापर करणे पंजाबला जमले नसल्याचे सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटले आहे. या सामन्यात एका क्षणाला पंजाबचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. संजू सॅमसन, स्टिव्ह स्मिथ मोक्याच्या क्षणी माघारी परतल्यामुळे पंजाब सामना सहज जिंकेल, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु, राहुल तेवतियाने शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर 5 षटकार खेचत सामना राजस्थानच्या दिशेने फिरवला. ज्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यामातून त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. हे देखील वाचा- RR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)
सचिन तेंडूलकर यांचे ट्विट-
पहिल्या नऊ सामन्यांनंतर गुणतालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स प्रत्येकी 2 विजयांसहीत 4 गुणांसोबत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. नेट रनरेटच्या हिशोबाने दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्सपेक्षा सरस असल्याने दिल्ली अव्वल स्थानी आहे. पंजाब, मुंबई, कोलकात्ता, चेन्नई, बंगळुरु हे पाचही संघांनी प्रत्येकी एका विजयासहीत दोन गुण मिळवले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर किंग्ज इलेव्हन पंजाब, चौथ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स, पाचव्या क्रमांकावर कोलकाता नाईट राईडर्स, सहाव्या क्रमांकावर चेन्नईसुपर किंग्ज आणि सातव्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आहे. मालिकेतील आपले पहिले दोन्ही सामने गमावल्याने सनरायझर्स हैदराबादला अजून गुणतालिकेमध्ये भोपळाही फोडता न आल्याने ते तळाशी आहेत.