IND vs BAN Test Series 2022: दुस-या कसोटीत रोहितच्या पुनरागमनावर कोण होणार आऊट? चाहत्यांनी 'या' खेळाडूवर नाराजी केली व्यक्त
दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा पुनरागमन करणार असल्याचे बोले जात आहे त्यामुळे कोणत्या खेळाडूला संघाबाहेर बसावयचे हा मोठा प्रश्न पडला आहे.
IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने प्रतिस्पर्ध्यांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 513 धावांचे अत्यंत कठीण लक्ष्य ठेवले होते. पहिल्या डावात अवघ्या 150 धावांवर बाद झालेल्या यजमानांची सलामीची जोडी तिसऱ्या दिवशी 42 धावांवर आहे. बांगलादेशचा संघ अजूनही लक्ष्यापासून खुप दूर आहे. टीम इंडियाचा विजय जवळपास निश्चित दिसत आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा पुनरागमन करणार असल्याचे बोले जात आहे त्यामुळे कोणत्या खेळाडूला संघाबाहेर बसावयचे हा मोठा प्रश्न पडला आहे. पण चाहत्यांनी या सामन्यात कर्णधार असलेला केएल राहुल (KL Rahul) पुन्हा एकदा निशाण्यावर धरले आहे.
अखेर राहुलवर चाहते का नाराज आहेत?
टीम इंडिया ही पहिली कसोटी जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे. भारतीय संघाच्या दृष्टीकोनातून या कसोटीत आतापर्यंत सर्व काही ठीक झाले आहे, परंतु तरीही संघाचा कर्णधार केएल राहुलला प्रचंड ट्रोल केले जात आहे. प्रश्न पडतो की असे का? या सामन्यात केएल पुन्हा एकदा फलंदाजीत अपयशी ठरला आहे. चट्टोग्राम कसोटीत भारतीय संघाचे कर्णधार असलेल्या केएल राहुलला पहिल्या डावानंतर दुस-या डावातही फलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी करता आली नाही. यामुळेच चाहते त्याला खूप ट्रोल करत आहेत. (हे देखील वाचा: Rohit Sharma Viral Video: भारतीय कर्णधार रोहित शर्माने झिम्बाब्वे अंडर-19 च्या युवा खेळाडूंना दिला गुरुमंत्र, पहा व्हिडीओ)
रोहितच्या पुनरागमनात राहुल बाद होईल का?
गेल्या वर्षभरात केएल राहुलची कामगिरी सर्व फॉरमॅटमध्ये खराब राहिली आहे. आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक यांसारख्या मोठ्या आयसीसी स्पर्धांमध्ये राहुल पूर्णपणे अपयशी ठरला. त्याचबरोबर बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेतही त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर चाहते केएलला संघातून वगळत आहेत. पुढील सामन्यात संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पुनरागमन करत आहे आणि अशा स्थितीत शुभमन गिल किंवा राहुल यांना वगळले जाऊ शकते. गिलने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक ठोकले. त्यामुळे राहुलला संघातून वगळण्याची मागणी चाहत्यांकडून होत आहे.