IPL 2023: आयपीएल मध्ये 'प्लेअर ऑफ द मॅच' कोण निवडतो? ट्वीट करुन आकाश चोप्राने दिले उत्तर
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचे तज्ज्ञ आकाश चोप्रा यांच्या मते, या कामासाठी इंग्लिश समालोचक निवडला जातो आणि तोच सामनावीराचा पुरस्कार कोणाला मिळेल हे ठरवतो.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवला (Surya Kumar Yadav) ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा (Player Of The Match पुरस्कार देण्यात आला. यानंतर ट्विटरवर एक ट्रेंड सुरू झाला आणि अनेक वापरकर्त्यांनी सामन्यात चार विकेट घेणाऱ्या आणि 79 धावा करणाऱ्या राशिद खानला (Rashid Khan) हा पुरस्कार देण्याची मागणी केली. ज्यानंतर प्रश्न येतो की आयपीएलमध्ये सामनावीराचा पुरस्कार कोणाला मिळणार हे कोण ठरवतं? यावर माजी क्रिकेटर आकाश चोप्राने उत्तर दिले आहे. (हे देखील वाचा: Rashid Khan Hits 10 Sixes: करामति राशिद खानने 21 चेंडूत झळकावले अर्धशतक, ठोकले 10 मोठे षटकार; पहा व्हिडिओ)
सामनावीर कसा निवडला जातो?
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचे तज्ज्ञ आकाश चोप्रा यांच्या मते, या कामासाठी इंग्लिश समालोचक निवडला जातो आणि तोच सामनावीराचा पुरस्कार कोणाला मिळेल हे ठरवतो. आकाश चोप्राने याबद्दल ट्विट करून लिहिले की, 'जे लोक विचार करत आहेत की POTM पुरस्कार कसा आणि कोण ठरवतो... वर्ल्ड फीड (इंग्रजी) चे एक समालोचक, ज्याची या कामासाठी निवड झाली आहे. त्यामुळे पुरस्कार कोणाला मिळणार हे नेहमीच 'ती' व्यक्ती ठरवते.
सूर्यकुमार यादव आणि रशीद खान चमकले
वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवने १०३ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 6 षटकारही मारले. त्याच्या खेळीमुळे संघाला २१८ धावांपर्यंत मजल मारता आली. त्याचा परिणाम विजयावरही झाला. त्याचबरोबर या सामन्यात रशीद खानने बॉल आणि बॅट या दोन्ही बाजूंनी चांगली कामगिरी केली. त्याने 4 बळी घेऊन मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले, तर फलंदाजीतही त्याने 10 षटकारांसह 79 धावा केल्या, तरीही तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याच्या खेळीचे सर्वत्र कौतुक झाले.