IND vs BAN 1st ODI Playing 11: नवीन खेळाडूंपैकी कोणाला मिळणार संधी; सर्वांच्या नजरा असतील ऋषभ पंतवर, जाणून घ्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन

ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर होणार्‍या या सामन्यात टीम इंडियाचा अंतिम-11 कोणता असेल, याविषयी अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

IND vs BAN (Photo Credit - Twitter)

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 4 डिसेंबरपासून सुरू होत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका टीम इंडियासाठी (Team India) खूप महत्त्वाची असेल. विशेष म्हणजे जर तो विश्वचषक भारतातच होणार असेल तर बऱ्याच काळानंतर टीम इंडिया आशियाई खेळपट्टीवर वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे. कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन होत असतानाच विराट कोहली आणि उपकर्णधार केएल राहुलही परतले आहेत. ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर होणार्‍या या सामन्यात टीम इंडियाचा अंतिम-11 कोणता असेल, याविषयी अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

नवीन खेळाडूपैकी कोणाला मिळणार संधी

भारतासाठी या मालिकेत असे अनेक खेळाडू आहेत जे पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतात. या मालिकेसाठी राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार आणि कुलदीप सेनसारखे खेळाडू भारतासाठी पदार्पण करू शकतात. भारतीय संघ एकदिवसीय विश्वचषकासाठी जोरदार सुरुवात करणार आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा या खेळाडूंना नव्या संघात संधी देऊ शकतो. (हे देखील वाचा: IND vs BAN 1st ODI 2022: धवन की राहुल? बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 'हा' असु शकतो रोहितचा सलामीचा जोडीदार)

सर्वांच्या नजरा असतील ऋषभ पंतवर 

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या फॉर्मबाबत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा होत आहे. येथील पहिल्या वनडेत सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतील. त्याचबरोबर तो कोणत्या पदावर खेळतो हेही पाहावे लागेल. कारण कर्णधार रोहित सोबत शिखर धवन सलामी करु शकतो. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर खेळेल. ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्यामध्ये पाचव्या क्रमांकावर कोण येते आणि सहाव्या क्रमांकावर कोण येते हे पाहावे लागेल. तर वॉशिंग्टन सुंदर सातव्या क्रमांकावर येईल. दुसरा फिरकीपटू म्हणून अक्षर पटेल की शाहबाज अहमदला संधी दिली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन 

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, दीपक चहर, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन.