IND vs AUS 4th Test 2024: मेलबर्न कसोटीत किती आहे सर्वात मोठे लक्ष्य? आकडा पाहून भारतीय संघाचो वाढले टेन्शन
आता टीम इंडियाचे टेन्शन थोडे वाढताना दिसत आहे.
Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाची शानदार गोलंदाजी चौथ्या दिवशी पाहायला मिळाली, पण तरीही ऑस्ट्रेलियाला 333 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या, त्यानंतर टीम इंडियाचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला होता आणि ऑस्ट्रेलियाकडे 105 धावांची आघाडी शिल्लक होती. आता टीम इंडियाचे टेन्शन थोडे वाढताना दिसत आहे. आता आम्ही तुम्हाला मेलबर्नमध्ये कसोटी क्रिकेटच्या सर्वात मोठ्या टार्गेटबद्दल सांगणार आहोत, ज्याचा पाठलाग इंग्लंडने केला होता.
मेलबर्नमधील कसोटी क्रिकेटचे सर्वात मोठे लक्ष्य
1928 साली मेलबर्न येथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला गेला. या सामन्याच्या शेवटच्या डावात इंग्लंडसमोर 322 धावांचे लक्ष्य होते. जे इंग्लंडने मिळवले होते आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. कसोटी क्रिकेटमधील या मैदानावर हे आतापर्यंतचे सर्वात मोठे लक्ष्य होते. (हे देखील वाचा: IND vs AUS 4th Test 2024 Day 2: जसप्रीत बुमराहच्या एका चुकीमुळे ऑस्ट्रेलिया ऑलआऊट होण्यापासून वाचला, चौथ्या दिवशी शेवटच्या षटकात काय घडले ते Video मध्ये पाहा)
1. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (322 लक्ष्य) – इंग्लंड-विजेता
2. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (297 लक्ष्य) – इंग्लंड-विजेता
3. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (295 लक्ष्य) – दक्षिण आफ्रिका – विजेता
4. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (286 लक्ष्य) – ऑस्ट्रेलिया – विजेता
5. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (282 लक्ष्य) – इंग्लंड – विजेता
टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडे आता 333 धावांची आघाडी आहे. जसजशी आघाडी वाढत आहे तसतसे टीम इंडियाचे टेन्शन थोडे वाढू लागले आहे. मेलबर्नमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने फक्त एकदाच विजय मिळवला आहे. 2020 मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासमोर 70 धावांचे लक्ष्य होते, जे भारतीय संघाने 2 गडी गमावून पूर्ण केले. टीम इंडियाने हा सामना 8 विकेटने जिंकला होता.