WI W vs NZ W, 2nd Semi Final Live Streaming: आज वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा उपांत्यफेरी सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
हा सामना दोन्ही संघांसाठी खास आहे, कारण जो जिंकेल तो अंतिम फेरीत प्रवेश करेल.
West Indies Women Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team 2nd Semi Final Match: सध्या यूएई मध्ये महिला टी-20 विश्वचषक 2024 सुरु आहे. 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता दुसरा उपांत्य सामना 18 ऑक्टोबरला म्हणजेच आज होणार आहे, ज्यामध्ये वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचे संघ (West Indies Women Cricket Team vs New Zealand Women) आमनेसामने असतील. हा सामना दोन्ही संघांसाठी खास आहे, कारण जो जिंकेल तो अंतिम फेरीत प्रवेश करेल. पराभूत संघाचा प्रवास इथेच संपेल. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
आकडेवारीत न्यूझीलंड वरचढ
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 23 टी-20 सामने झाले आहेत, ज्यामध्ये न्यूझीलंडचा वरचष्मा होता. न्यूझीलंडने 17 सामने जिंकले, तर वेस्ट इंडिजने 5 सामने जिंकले. एका सामन्याचा निकाल लागला नाही. (हे देखील वाचा: South Africa Women's Team Win 1st Semi Final: दक्षिण आफ्रिका महिला संघाची फायनलमध्ये धडक; ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून विजय)
ग्रुप स्टेजमध्ये दोन्ही संघांची कशी होती कामगिरी ?
न्यूझीलंडला अ गटात ठेवण्यात आले आहे. त्यांनी ग्रुप स्टेजमधील 4 पैकी 3 सामने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. वेस्ट इंडिजला ब गटात ठेवण्यात आले होते, तर त्याने 4 पैकी 3 सामने जिंकून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले होते. आज हे दोन्ही संघ अंतिम लढतीसाठी आमनेसामने असतील.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
तुम्हाला भारतातील या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग पहायचे असेल तर तुम्ही ते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. तसेच मोबाईलमध्ये Disney+ Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेवू शकता.
दोन्ही देशाची संभाव्य प्लेइंग 11
वेस्ट इंडिज: हेली मॅथ्यू (कर्णधार), कियाना जोसेफ, शमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, चाडियन नेशन, जैदा जेम्स, अश्मिनी मुनिसार, आलिया ॲलेने, आफी फ्लेचर, करिश्मा रामहरक.
न्यूझीलंड: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रूक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास.