West Indies Squad Announced for Test Series Against Pakistan: पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर, 'या' युवा खेळाडूला मिळाली संधी
अलीकडच्या काही महिन्यांत चांगली कामगिरी करणारा डावखुरा फलंदाज आमिर जांगूला कसोटी संघात संधी मिळाली आहे. त्याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शानदार शतक झळकावले.
West Indies Cricket Team vs Pakistan Natioanl Cricket Team: पाकिस्तान दौऱ्यावर वेस्ट इंडिजला दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील दोन्ही सामने मुलतान क्रिकेट स्टेडियमवर 17 ते 29 जानेवारी 2025 दरम्यान खेळवले जातील. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे. वेस्ट इंडिजचा संघ 18 वर्षानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचा दौरा करणार आहे. अलीकडच्या काही महिन्यांत चांगली कामगिरी करणारा डावखुरा फलंदाज आमिर जांगूला कसोटी संघात संधी मिळाली आहे. त्याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शानदार शतक झळकावले. त्याच्याशिवाय गुडाकेश मोतीचेही संघात पुनरागमन झाले आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत तो खेळला नाही.
पाकिस्तान दौऱ्यासाठी वेस्ट इंडिज संघ:
क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जोशुआ दा सिल्वा, ॲलेक अथानाझे, केसी कार्टी, जस्टिन ग्रीव्ह्स, क्वेम हॉज, टेविन इम्लाच, अमीर जांगू, मिकेल लुईस, गुडाकेश मोती, अँडरसन .फिलिप, केमार रोच, केविन सिंक्लेअर, जेडेन वॉर्डी सील्स
वेस्ट इंडिजचा पाकिस्तान दौरा
2-दिवसीय सराव सामना: शुक्रवार 10-11 जानेवारी 2025, रावळपिंडी
पहिला कसोटी सामना: शुक्रवार 17-21 जानेवारी 2025, मुलतान क्रिकेट स्टेडियम
दुसरी कसोटी सामना: शनिवार 25-29 जानेवारी 2025, मुलतान क्रिकेट स्टेडियम