AFG vs WI Test: वेस्ट इंडिजचा सर्वात वजनदार क्रिकेटपटू रहकीम कॉर्नवाल ने मोडला रविचंद्रन अश्विन चा 'हा' मोठा विक्रम, भारतात केली सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंद
कॉर्नवालने पहिल्या डावात 25.3 षटकांत पाच मेडन ओव्हरसह 75 धावांवर एकूण 7 विकेट घेतल्या. यासह, कॉर्नवालने 2019 मध्ये भारतीय भूमीवरील कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातील सर्वोत्कृष्ट डावाच्या विक्रमाची नोंद केली.
सर्वोत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडीजचा (West Indies) सर्वात वजनदार खेळाडू राहकीम कॉर्नवाल (Rahkeem Cornwall) याने संपूर्ण अफगाणिस्तान (Afghanistan) संघाला पहिल्या डावात केवळ 187 धावांवर बाद केले. कॉर्नवालने पहिल्या डावात 25.3 षटकांत पाच मेडन ओव्हरसह 75 धावांवर एकूण 7 विकेट घेतल्या. यासह, कॉर्नवालने 2019 मध्ये भारतीय भूमीवरील कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातील सर्वोत्कृष्ट डावाच्या विक्रमाची नोंद केली. या प्रकरणात कॉर्नवालने भारताचा स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विन (R Ashwin) याला पिछाडीवर टाकले आहे. अश्विनने पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी सामन्यात 46.2 षटकांत 145 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. शिवाय, जॅक नोर्झिया नंतर विंडीजच्या फिरकी गोलंदाजाकडून कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नोंदवलेली कॉर्नवालने आकडेवारी सर्वोत्कृष्ट आहे. 48 वर्षांपूर्वी जॅकने भारताविरुद्ध 95 धावांवर 9 विकेट घेतले होते. (IND vs WI 2019: भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिज संघ जाहीर, कोण In आणि कोण Out जाणून घ्या)
लखनौमध्ये सुरू असलेल्याअफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजकडून कॉर्नवालने पहिल्या डावात 7 विकेट्स घेतल्यानंतर कॉर्नवॉलने दुसर्या दिवशी आणखी 3 विकेट्स घेतल्या आणि एकूण विकेटची संख्या 10 पर्यंत नेली. असे करून कॉर्नवाल फेब्रुवारी 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह ओकिफ (Steve O'Keefe)याच्यानंतर भारतातील कसोटी सामन्यात 10 विकेट घेणारा पहिला फिरकीपटू ठरला. 2013 च्या पुणे सामन्यात ओकिफने 70 धावांवर12 विकेट घेण्याची नोंद केली. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी अखेर डिसेंबर 2010 मध्ये इंग्लंड विरुद्ध 4 सामन्यांच्या मालिकेत कसोटीत दहा विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान, उप-खंडातील कसोटी सामन्यात 10 विकेट घेणाराकॉर्नवाल आता पहिला वेस्ट इंडिज फिरकीपटू आहे.
कॉर्नवालच्या या पराक्रमाआधी अफगाणिस्तानचा डावखुरा फिरकीपटू हमजा होटक याने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 5 विकेटची नोंद केली. सध्या, दुसऱ्या डावात फलंदाजी करत अफगाणिस्तानने 109 धावांवर 7 गडी गमावले आहेत आणि त्यांनी विंडीजवर 19 धावांची आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानच्या 187 धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने पहिल्या डावात 277 धावा केल्या. विंडीजसाठी शरमर ब्रूक्स याने सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने 111 धावांची खेळी केली.