Virat Kohli Eight Thousand IPL Runs: एलिमिनेटर सामन्यात विराट कोहलीचा भीम पराक्रम, आयपीएलमध्ये कोणताही फलंदांज करु शकला नाही अशी कामगिरी
आयपीएलमध्ये 8000 धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. आयपीएल 2024 मध्येही विराट कोहलीच्या बॅटला आग लागली आहे.
RR vs RCB, IPL 2024 Eliminator: आयपीएल 2024 च्या (IPL 2024) एलिमिनेटर सामन्यात आज राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (RCB vs RR) होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) हा सामना खेळला जात आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत आरसीबी प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. आरसीबीचा सलामीवीर विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात 29 धावा करत इतिहास रचला. आयपीएलमध्ये 8000 धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. आयपीएल 2024 मध्येही विराट कोहलीच्या बॅटला आग लागली आहे. 17व्या सत्रात सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा
विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या यादीत शिखर धवन दुसऱ्या, रोहित शर्मा तिसऱ्या, डेव्हिड वॉर्नर चौथ्या आणि सुरेश रैना पाचव्या स्थानावर आहे. या यादीत महेंद्रसिंग धोनी (5243) सहाव्या, एबी डिव्हिलियर्स (5162) सातव्या, ख्रिस गेल (4965) 8व्या, रॉबिन उथप्पा (4952) 9व्या आणि दिनेश कार्तिक (4831) 10व्या स्थानावर आहे. (हे देखील वाचा: ICC T20I World Cup 2024: नीता अंबानी यांनी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना T20 विश्वचषकासाठी दिल्या शुभेच्छा, पहा व्हिडिओ)
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली: 8000* धावा
शिखर धवन : 6769 धावा
रोहित शर्मा : 6628 धावा
डेव्हिड वॉर्नर : 6565 धावा
सुरेश रैना : 5528 धावा