Virat Kohli Workout in Quarantine: विराट कोहली क्वारंटाइनमध्ये अशाप्रकारे राहतोय फिट, शेअर केला वर्कआऊट Video
चेन्नईत आपला क्वारंटाइन पूर्ण करणाऱ्या विराट कोहलीने आपल्या वर्कआउटचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. इंग्लंडविरुद्ध एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सलामीच्या टेस्ट मॅचपूर्वी क्वारांटाइनचा पुरेपूर फायदा करून घेण्याची विराट खात्री करुन घेत आहे. विराटच्या या व्हिडिओमध्ये पंजाबी गाणं ऐकू येत आहे. कोहलीला पंजाबी गाणी खूप आवडतात आणि तो आपल्या फिटनेसचीही खूप काळजी घेतो.
Virat Kohli Workout in Quarantine: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात 5 फेब्रुवारीपासून चार कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. दोन्ही संघ पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी चेन्नईला (Chennai) पोहोचले आहेत आणि सध्या ते आठवड्याभरासाठी क्वारंटाइन आहेत. दरम्यान, चेन्नईत आपला क्वारंटाइन पूर्ण करणाऱ्या विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या वर्कआउटचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. इंग्लंडविरुद्ध एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सलामीच्या टेस्ट मॅचपूर्वी क्वारांटाइनचा पुरेपूर फायदा करून घेण्याची विराट खात्री करुन घेत आहे. कोहलीने चाहत्यांना आपल्या हॉटेलच्या खोलीत क्वारंटाइन वेळ कसा घालवत आहे याची एक झलक त्याने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे दिली. टीम इंडिया कर्णधार विराटने व्हिडिओ शेअर केला ज्यात तो हॉटेलच्या खोलीत सायकल चालवताना दिसत आहे. (IND vs ENG Series 2021: इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीचा दबदबा! इंग्लिश टीमविरुद्ध टेस्ट सामन्यात आतापर्यंत ठोकली आहे 5 शतके)
व्हिडिओला कॅप्शन देताना कोहलीने लिहिले की, “PropheC गाणं आणि जिमच सामना क्वारंटाइनमध्ये तुम्हाला इतक्याच सामग्रीची आवश्यकता असते. इच्छित असल्यास काम कोठेही करता येते. सर्वांना एक चांगला दिवस जावो.” विराटच्या या व्हिडिओमध्ये पंजाबी गाणं ऐकू येत आहे. कोहलीला पंजाबी गाणी खूप आवडतात आणि तो आपल्या फिटनेसचीही खूप काळजी घेतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अॅडिलेड येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट पितृत्व रजेवर मायदेशी परतला होता. ज्यामुळे, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टेस्ट सिरीजमधील उर्वरित तीन सामने तो खेळू शकला नाही. पहा विराटचा वर्कआऊट व्हिडिओ:
दुसरीकडे, इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी कोहलीव्यतिरिक्त हार्दिक पांड्या आणि ईशांत शर्मा यांनाही संघात स्थान देण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमधील प्रभावी कामगिरी करणारे वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनीही संघात स्थान मिळवले आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी फिरकीपटू अक्षर पटेलनेही कसोटी संघात प्रवेश केला आहे तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध द गाब्बा येथे पदार्पण सामना खेळलेल्या टी नटराजनला इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांसाठी वगळले आहे. दरम्यान, इंग्लंड संघात बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरचे कमबॅक झालं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)