Virat Kohli-Anushka Sharma Wedding Anniversary: लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवशी विराटने अनुष्काला दिल्या 'या' खास शुभेच्छा, शेअर केला सुंदर Photo

सध्या विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून अनुष्का मुंबईतील आपल्या घरी आहे. अशा स्थितीत अनुष्कासोबत आपल्या लग्नातला एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो विराटने शेअर केला.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Photo Credit: Twitter/imVkohli)

Virat Kohli-Anushka Sharma Wedding Anniversary: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आज त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहेत. 2017 मध्ये 'वीरूष्का' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जोडप्याने इटलीत (Italy) राजेशाही थाटात गुपचूप लग्न केलं होतं. सध्या विराट ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर असून अनुष्का मुंबईतील आपल्या घरी आहे. अशा स्थितीत अनुष्कासोबत आपल्या लग्नातला एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो विराटने शेअर केला आणि लिहिले, "3 वर्ष आणि आयुष्यभराची साथ." विराटने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघे लग्नमंडपात असल्याचे दिसत आहे. विराट आणि अनुष्का 2013 पासून एकमेकांना डेट करत होते शिवाय, तसेच त्यांच्या लग्नात प्रसारमाध्यमांना बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, बीसीसीआयने विराटची पॅटर्निटी राजा मंजूर केली आहे, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळून भारतात परतणार असेल. (IND vs AUS: तिसऱ्या टी-20 दरम्यान विराट कोहलीचा Lookalike सिडनीच्या मोठ्या पडद्यावर झळकला, पाहून भारतीय कर्णधाराने दिली अशी प्रतिक्रिया Watch Video)

विराट आणि अनुष्काच्या घरी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात पाळणा हलणार आहे. दोंघांच्या आयुष्यात लवकरच नवीन सदस्य येणार आहे, त्यामुळे विराटने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्याऐवजी आपली पत्नी अनुष्कासोबत राहण्याला अधिक महत्व दिले आणि भारतीय कर्णधाराने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतरही दोघे एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी धडपडत होते. कोहली आपल्या क्रिकेट कारकिर्दीमुळे सतत प्रवास करीत होता, तर अनुष्का तिच्या चित्रपट आणि इतर कामांमध्ये व्यस्त होती. मात्र, मार्च 2020 मध्ये कोविड -19 मुळे लॉकडाउन सुरू झाले असल्याने जोडप्याने बराचसा वेळ एकमेकांसोबत घालवला आहे. पाहा विराटने शेअर केलेला 'हा' सुंदर फोटो...

दुसरीकडे, मर्यादित ओव्हरच्या मालिकेनंतर भारत-ऑस्ट्रेलिया संघ 17 डिसेंबरपासून कसोटी क्रिकेटमध्ये आपले हात आजमावतील. अ‍ॅडिलेड ग्राउंडवर पहिला सामना खेळला जाणार असून तो दिवस/रात्र सामना असेल. ऑस्ट्रि आणि भारतीय संघात पहिल्यांदा गुलाबी चेंडूने कसोटी मालिका खेळली जाणार आहे. टीम इंडियाने मागील वर्षी, 2019मध्ये, बांग्लादेशविरुद्ध कोलकाताच्या इडन गार्डनवर पहिला दिवस/रात्र सामना खेळला होता तर ऑस्ट्रेलियाने गुलाबी चेंडूने आजवर 7 सामने खेळला असून ते अजिंक्य राहिले आहेत.