विराट कोहलीला त्याच्या बायोपिकमध्ये करायची आहे स्वतःची भूमिका, पत्नी अनुष्का शर्माच्या भूमिकेबद्दल केले 'हे' विधान
इंस्टाग्रामवर लाईव्ह सत्रा दरम्यान सुनीलने कोहलीला त्याच्या बायोपिकमध्ये कोणास पाहायचे आहे असे विचारले, तेव्हा विराट त्वरित म्हणाला, "मी स्वतः! मला वाटत नाही की माझ्यासारखा कोणीही मला खेळू शकेल. मी स्वत: चित्रपटात असेन आणि यात अनुष्काचीही भूमिका असणार आहे."
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि माजी फुटबॉल कर्णधार सुनील छेत्री (Sunil Chhetri) यांच्यात रविवारी इंस्टाग्रामवर लाईव्ह सत्र पार पडले. दोघांनी या दरम्यान मजेदार विषयांवर चर्चा केली. क्रिकेटर्सवरील बायोपिकला चाहत्यांकडून भारतात खूप पसंती मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत, एमएस धोनी, सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन यासारख्या क्रिकेटपटूंवर बायोपिक्स बनविण्यात आले असून त्यांचं चाहत्यांनी कौतुक केले. आणि सध्या जर सर्व काही ठीक राहिले तर चाहत्यांना कर्णधार विराटवरील बायोपिक देखील पाहू शकतात. कोहलीची कारकीर्द बॉलिवूड चित्रपटासाठी योग्य ठरेल. इंस्टाग्रामवर लाईव्ह सत्रा दरम्यान सुनीलने कोहलीला त्याच्या बायोपिकमध्ये कोणास पाहायचे आहे असे विचारले, तेव्हा विराट त्वरित म्हणाला, "मी स्वतः! मला वाटत नाही की माझ्यासारखा कोणीही मला खेळू शकेल. मी स्वत: चित्रपटात असेन आणि यात अनुष्काचीही (Anushka) भूमिका असणार आहे." (अनुष्का शर्मा ने उघड केला विराट कोहली याचा खोटारडेपणा, सुनील छेत्री याला लाईव्ह चॅटमध्ये झाले हसू अनावर, पाहा Video)
बायोपिकमध्येही मुख्य भूमिका साकारण्यासाठी विराट तयार आहे पण एका अटीवर. कोहली म्हणाला की, चित्रपटात त्याची पत्नी अनुष्काची भूमीका तिने केली तरच तो त्याच्या बायोपिकमध्ये काम करण्यास तयार आहे. यावर सुनीलने उत्तर दिले की, "माझा विश्वास आहे की आपण हे करू शकता कारण लोकांना माहित नाही परंतु आपण खूप मजेदार आहात आणि आपण अभिनय देखील करू शकता." मात्र कोहली म्हणाला, '' मी अभिनय करू शकतो हा एक गैरसमज आहे आणि मला ते थेट सांगायचे आहे. पहा, मी फुटबॉल देखील खेळू शकतो. पण याचा अर्थ असा आहे की तुम्ही मला आयएसएल (इंडियन सुपर लीग) मध्ये खेळायला घेणार? शक्यच नाही! त्याच प्रकारे, मी कॅमेरा सामोरे जाऊ शकतो परंतु आपण त्यास अभिनय म्हणू शकत नाही." पाहा हा मजेदार व्हिडिओ:
दरम्यान, विराट आणि अनुष्काने छुप्या पद्धतीने 2017 मध्ये लग्न केले. लग्नात केवळ जोडप्याचे कुटुंब आणि मित्र उपस्थित होते. इटलीमध्ये लग्नानंतर या जोडप्याने दिल्ली आणि मुंबईत भव्य रिसेप्शन आयोजित केले होते. अनुष्काला भेटण्यापूर्वी तो स्वत: ची स्वार्थी आणि आपल्या सोईचं क्षेत्र सांभाळण्यावर लक्ष केंद्रित करत होता असेही 31 वर्षीय कोहलीने कबूल केले.