Most Popular Global Cricketers: कोहली कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी जागतिक स्तरावरील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू; टीम इंडिया सर्वात प्रिय क्रिकेट संघ
जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट संघ म्हणून ‘टीम इंडिया’ने देखील अव्वल स्थान मिळवले आहे. रोहित शर्माने दुसरे, तर निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेला महेंद्र सिंह धोनीने टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) लोकप्रियतेला काहीच मर्यादित नाही आणि पुन्हा एकदा एका अभ्यासानंतर याची खात्री पटली की 31 वर्षीय क्रिकेटपटू हा जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. दरम्यान, जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट संघ (Most Popular Cricket Team) म्हणून ‘टीम इंडिया’ने (Team India) देखील अव्वल स्थान मिळवले आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात क्रिकेट सामने आयोजित झाले नसले तरी भारतीय क्रिकेटपटूंची लोकप्रियता कमी झालेली नाही आणि पुन्हा एकदा अभ्यासातून हे पक्क झाले आहे. विराटने या क्रमवारीत अव्वल स्थान मिळावले असून 'हिटमॅन' रोहित शर्माने (Virat Kohli) दुसरे स्थान मिळवले आहे. इतकंच नाही तरी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेला महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) देखील टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे. SEMrushने लॉकडाऊन दरम्यान केलेल्या अभ्यासात विराट सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा केला जाणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. (आयपीएल 2020 पूर्वी विराट कोहली इमोशनल, आरसीबी सोबत प्रवासाचा भावनिक व्हिडिओ केला शेअर Watch Video)
जानेवारी ते जून दरम्यान प्रति महिना सरासरी 16.2 लाख वेळा कोहलीचं नाव सर्च केलं गेलं. या कालावधीक टीम इंडियाची सरासरी 2.4 लाख इतकी होती. टॉप-10 खेळाडूंमध्ये रोहित, धोनी, जॉर्ज मॅके, जोश रिचर्ड्स, हार्दिक पांड्या, सचिन तेंडुलकर, क्रिस मॅथ्यूज आणि श्रेयस अय्यर आहेत. जानेवारी ते जून काळात प्रत्येक क्रिकेटपटूला 9.7, 9.4, 9.1, 7.1, 6.7, 5.4, 4,1 आणि 3,4 लाख वेळा सर्च केले गेले. याव्यतिरिक्त, पहिल्या दहामध्ये महिला खेळाडूंचं समावेश नसला तरी स्मृती मंधाना आणि एलिस पेरी यांना युवराज सिंह आणि शिखर धवनसारख्या मोठ्या नावांमध्ये अव्वल स्थान मिळाले.स्मृती 12 व्या तर एलिस 20 व्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, क्रिकेट टीमच्या संदर्भात भारताने या क्रमवारीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांना पछाडत अव्वल क्रमांक पटकाविला. प्रत्येक क्रिकेट संघाला प्रत्येक महिन्यात अनुक्रमे 66, .33, .29, .23, .16, .12, .12, .09, .05, .04 आणि .03 लाख वेळा सर्च केले गेले. “आमच्या अभ्यासाच्या निकालांमुळे आम्हाला आश्चर्य वाटले नाही, तरीही आम्ही उत्साही आहोत. विराट कोहली हा सर्वात जास्त शोधला जाणारा क्रिकेटपटू आहे आणि भारत, सर्वात जास्त शोधला जाणारा क्रिकेट संघ आश्चर्यचकित करणारा आहे, आश्चर्य म्हणजे काय की महिला क्रिकेटपटूंचा शोध बर्याचदा अव्वल दर्जाच्या पुरुषांपेक्षा जास्त वेळा शोधले जाते.”