Virat Kohli's RCB Journey: आयपीएल 2020 पूर्वी विराट कोहली इमोशनल, आरसीबी सोबत प्रवासाचा भावनिक व्हिडिओ केला शेअर (Watch Video)
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएल 2020च्या सुरुवाती आधी भावूक झाला आहे. कोहलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो इमोशनल झालेला दिसत आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोहली आणि आरसीबीचे यश दाखवण्यात आले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आयपीएल (IPL) 2020च्या सुरुवाती आधी भावूक झाला आहे. कोहलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो इमोशनल झालेला दिसत आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोहली आणि आरसीबीचे (RCB) यश दाखवण्यात आले आहे. आयपीएलच्या इतिहासात आरसीबी संघाने एकदाही जेतेपद मिळवले नाही, अशा परिस्थितीत चाहते सोशल मीडियावर आरसीबीला अनेकदा ट्रोल करताना दिसतात. पण, व्हिडिओ सामायिक करुन आयपीएल 2020 मध्ये विजेतेपद जिंकण्याची आशा कोहलीने जागृत केली आहे. व्हिडिओमध्ये कोहली आपल्या साथीदारांसह मस्ती करताना दिसत आहे. कोहलीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, 'निष्ठा ही सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे, काय होईल याची प्रतीक्षा करू शकत नाही." (रवि शास्त्री आणि विराट कोहली यांच्या जोडीच्या यशाचे कारण माजी ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केले उघड, वाचा सविस्तर)
व्हिडिओमध्ये कोहली आरसीबीशी संबंधित जुन्या आठवणी दाखवल्या आहेत. विराटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्वत: कर्णधार म्हणत आहे की, "आरसीबी संघात जो कोणी येतो तो इथला बनून जातो." दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे यंदा आयपीएल संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे होणार आहे. आजवर मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे, तर सीएसकेने 3 वेळा जेतेपद जिंकले आहे. यावेळी कोहलीच्या कर्णधारपदावर अधिक दबाव असेल.
पाहा विराटचा व्हिडिओ:
अलीकडेच कोहलीने आयपीएलमधील सहकारी खेळाडू दक्षिण आफ्रिका एबी डिव्हिलियर्सला आरसीबीचे साथ न शोधण्याचे सांगितले होते. इंस्टाग्रामवर चॅटिंगमध्ये कोहली म्हणाला, "मी या संघाला (आरसीबी) सोडण्याचा विचार कधीही करू शकत नाही. जोपर्यंत मी आयपीएल खेळत आहे तोपर्यंत मी नेहमी निष्ठावान राहील. आम्हाला माहित आहे की दोघांनाही जेतेपद पटकावायचे आहे."
(The above story first appeared on LatestLY on Aug 10, 2020 12:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

