Virat Kohli's Captaincy 'X-Factor': 'टेस्ट सामना जिंकण्यासाठी एका दिवसात 300 धावा करण्यातून माघार घेणार नाही', टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीचा मोठा दावा

या दरम्यान मयंकने विराटला त्याच्या कर्णधारपदाच्या एक्स फॅक्टरबद्दल विचारले आणि कोहलीने उत्तर दिले की, “एखाद्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी जर तुम्हाला 300 धावांचा पाठलाग करावा लागला असेल तर मी संघातील खेळाडूंना सांगेन की हे केले पाहिजे, मी कधीही ड्रॉ साठी म्हणणार नाही.”

विराट कोहली (Photo Credits: Getty Images)

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या आक्रमक कर्णधारपदासाठी ओळखला जातो. कोहली कसोटीत कर्णधार असो वा वनडे किंवा टी-20 क्रिकेट, पहिल्याच चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत तो उत्साही दिसतो. म्हणूनच ते नेहमी विजयासाठी भुकेला दिसतो. कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी कठीण परिस्थितीत विजयालाविराटने आपल्या कर्णधारपदाच्या एक्स फॅक्टर म्हटले. भारतीय संघाचा सलामी फलंदाज मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) बीसीसीआयच्या (BCCI) अधिकृत संकेतस्थळावर कर्णधार विराटशी दीर्घ चर्चा केली. या दरम्यान मयंकने विराटला त्याच्या कर्णधारपदाच्या एक्स फॅक्टरबद्दल (Captaincy X-Factor) विचारले आणि कर्णधार कोहलीने उत्तर दिले की, “मी कोणत्याही परिस्थितीत निकालाबाबत तडजोड करू शकत नाही. एखाद्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी जर तुम्हाला 300 धावांचा पाठलाग करावा लागला असेल तर मी संघातील खेळाडूंना सांगेन की हे केले पाहिजे, मी कधीही ड्रॉ साठी म्हणणार नाही.” (विराट कोहलीला कारकीर्दीच्या सर्वात वाईट टप्प्यात 'या' भारतीय दिग्गजांनी दिला गुरु मंत्र, पाहा 2014 इंग्लंड दौऱ्याने कसा बद्दल विराटचा खेळ Watch Video)

विराटनेही त्याची योजना काय असेल हे देखील सांगितले. कर्णधार कोहली म्हणाला, “जर आम्हाला 300 धावांचे लक्ष्य मिळाले तर मी संघाला सांगावे की ते जिंकलेच पाहिजे. पहिल्या सत्रात जर आपण 80 किंवा 1 विकेट गमावून आपण 80 धावा केल्या आणि दुसर्‍या सत्रात आम्ही 100 धावा केल्या तर शेवटच्या सत्रात आमच्याकडे धावा करण्यासाठी 120 धावा असतील. तेथे, जर आपल्याकडे 7 विकेट असतील तर आपण तो सामना वनडे प्रमाणे खेळून जिंकू शकतो.” 31 वर्षीय कोहलीने पुढे म्हटले की, तिसर्‍या सत्रामध्ये आपल्याकडे विकेट शिल्लक राहिली नाहीत तर ड्रॉ साठी खेळले जाऊ शकते.

विराटने म्हटले की, “परिस्थिती फारच वाईट असल्याशिवाय मी शेवटच्या सत्राच्या शेवटच्या घटकापर्यंत ड्रॉ साठी जाणार नाही. कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवसाच्या सुरुवातीपासून मी प्रत्येकाला सांगेन की आम्हाला इतक्या धावांचा पाठलाग करायचा आहे. पराभवाची भीती बाळगणे हे स्वतःह एक नुकसान आहे, कारण जर तुम्ही विजयाचा विचार न करता आत्मसमर्पण केले तर ते चुकीचे आहे.” विराटने मयंकला सांगितले की जर आपण सलामी फलंदाज असाल आणि त्या सामन्यात शेवटच्या दिवशी 120 धावांची खेळी केली तर पुढील दहा वर्षे लोक तुमची आठवण करतील. तुम्हालाही तो क्षण आजीवन आठवायला आवडेल. हे असे काही दिवस आणि क्षण आहेत जेव्हा की आम्ही कसे खेळलो याबद्दल आपल्याला अभिमान वाटेल. लोक स्वतःला कसे लक्षात ठेवू शकतात हे माझे ध्येय आहे.