Online Rummy Games: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला केरळ उच्च न्यायालयाचे नोटीस

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत पुनरागमन करण्याआधीच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अडचणीत सापडला आहे.

विराट कोहली, भारत-ऑस्ट्रेलिया वनडे (Photo Credit: PTI)

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत पुनरागमन करण्याआधीच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अडचणीत सापडला आहे. केरळ उच्च न्यायालयाने विराट कोहलीला ऑनलाईन रम्मीवर (Online Rummy Games) बंदी घालण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस बजावली आहे. कर्णधार विराट कोहली व्यतिरिक्त उच्च न्यायालयाने अभिनेत्री तमन्नाह भाटिया (Tamannaah Bhatia) आणि अभिनेता अजू वर्गीस (Aju Vargheese) यांनाही नोटीस पाठविली आहे. हे सर्वजण ऑनलाइन रम्मी गेम्सचे ब्रँड अँबेसेडर आहेत.

या याचिकेवर सुनावणी करताना केरळ हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश एस माणिकुमार आणि न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन यांच्या खंडपीठाने भारतीय कर्णधार विराट कोहलीला नोटीस बजावली आहे. ऑनलाईन रम्मी खूप लोकप्रिय होत आहे आणि त्याला बंदी घालण्याची गरज आहे, अशी माहिती याचिका दाखल करणार्‍या थेस्सुरमधील रहिवासी पौली वडक्कन यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिली आहे. त्यांच्या मते, इतर अनेक राज्यांनी यापूर्वीच हा निर्णय घेतला आहे. हे देखील वाचा- IND vs ENG Series 2021: टीम इंडियाशी दोन-हात करण्यासाठी जो रूटचा इंग्लंड संघ चेन्नईत दाखल, एअरपोर्टवर झाली COVID टेस्ट, पहा Photos

एएनआयचे ट्विट-

ऑस्ट्रेल्या दौऱ्यावर विराट कोहली कसोटी मालिकेती पहिला सामना खेळल्यानंतर भारतात परतला होता. आता भारतीय संघ आपल्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारताला 5 टी-20 सामने आणि त्यानंतर 3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.



संबंधित बातम्या