10000 धावांच्या विक्रमावर विराट कोहलीने दिली 'अशी' प्रतिक्रीया (Video)

विशाखापट्टनममध्ये वेस्टइंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने 10000 धावांचा टप्पा पूर्ण करत सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडला.

विराट कोहली (Image: PTI/File)

विशाखापट्टनममध्ये वेस्टइंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने 10000 धावांचा टप्पा पूर्ण करत सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावांचा टप्पा विराटने गाठला आहे. कोहलीने हा रेकॉर्ड 205 डावांमध्ये पूर्ण केला. यापूर्वी हा रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने 259 डावात 10000 धावा करत आपल्या नावे केला होता. विराट कोहलीच्या 10000 धावांनंतर अनुष्काने असा व्यक्त केला आनंद

यानंतर विराटवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. पण यावर खुद्द विराटने प्रतिक्रीया दिली आहे. तो म्हणाला की, "देशासाठी खेळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 10 वर्ष खेळल्यानंतरही मी कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी स्वतःला हक्कदार मानत नाही. पण मला खूप छान वाटत आहे. मला कधी वाटलं नव्हतं की, माझ्या आयुष्यात असाही क्षण येईल. पण तो आलायं. आणि त्याबद्दल मी देवाचे खूप आभार मानतो."

त्याचबरोबर कोहली पुढे म्हणाला की, "जेव्हा कधी तुम्हाला संधी मिळते तेव्हा तुम्ही तिच्या कठोर परिश्रम घ्यायला हवेत. कोणतीच गोष्ट गृहीत धरु नका. धावांची भूक तुमच्यात असायला हवी. कोणत्याही क्षणी स्वतःला संतुष्ट मानू नका." तसंच तो म्हणाला की, "मी देशासाठी खेळून कोणावरही उपकार करत नाही. ते माझे कर्तव्य आहे."



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

West Indies vs Bangladesh 1st Test 2024 Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवसाच्या खेळाला किती वाजता होणार सुुरुवात, भारतात कोणत्या ओटीटी सामन्यावर घेणार लाइव्ह सामन्याचा आनंद? घ्या जाणून

Bhutan vs Bahrain ICC Mens T20 World Cup Asia Qualifier B 2024 Live Streaming: आज भूतान आणि बहरीन यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी आणि कुठे पाहणार लाइव्ह मॅच

India vs Australia 1st Test Day 2 Scorecard: ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर गारद, बुमराहने घेतल्या पाच विकेट; भारताने घेतली 46 धावांची आघाडी

IPL Mega Auction 2025 Live Streaming: किती वाजता सुरु होणार लिलाव? तुम्ही कोणत्या टीव्ही चॅनेल आणि ओटीटी पाहणार लाइव्ह? एका क्लिकवर जाणून संपूर्ण महिती