IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final मॅचआधी जसप्रीत बुमराहचे अनुकरण करत विराट कोहली ने केली नेट्समध्ये बॉलिंग, पहा (Video)

याचाच एक विडिओ ट्विटर यूजर हर्षल गधाक याने शेअर केला आहे.

विश्वचषक 2019मध्ये आज भारत (India) विरूद्ध न्यूझीलंड (New Zealand) संघात सेमीफाइनलची लढत सुरु आहे. या दोन संघांमधील सेमीफायनल सामना मॅन्चेस्टर (Manchester) च्या ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानावर सुरु आहे. हा सामना जिंकतात एक संघ फायनल फेरीत धडक मारेल तर दुसऱ्या संघाचे स्वप्न धुळीत जाईल. विश्वकपच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, या महत्वाच्या मॅचआधी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा एक विडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे. (IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final मॅचमध्ये एम एस धोनी याने रचला इतिहास, बनला 350 वनडे सामने खेळणारा दुसरा भारतीय)

विराट हा उत्तम दर्जेचा फलंदाज आहेच त्याशिवाय तो उत्तम वेगवान गोलंदाज देखील आहे. आपले हे गुपित त्याने भूतकाळातील मुलाखतींमध्ये स्वीकारले आहेत. आणि न्यूझीलंडविरुद्ध सामन्याआधी कोहलीने यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रित बुमरा (Jasprit Bumrah) च्या गोलंदाजीचे अनुकरण करत नेट्समध्ये सराव करताना दिसला. याचाच एक विडिओ ट्विटर यूजर हर्षल गधाक याने शेअर केला आहे.

दुसरीकडे, न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दोन ओव्हर निर्धाव टाकल्यानंतर बुमराहने सलामीवीर मार्टिन गुप्टिल (Martin Guptill) ला बाद केले. दरम्यान भारत-न्यूझीलंड यांचा यंदाच्या विश्वचषकमधील हा पहिला सामना आहे. साखळी फेरीतील सामना पावासामुळे रद्द झाला होता.