Virat Kohli Uses Saliva on Ball: अरेरेरे! विराट कोहलीला पडला ICC च्या नियमांचा विसर, चूक लक्षात येताच RCB कर्णधाराने दिली 'अशी' प्रतिक्रिया (Watch Video)
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटच्या नियमातही मोठा बदल करण्यात आला आहे. चेंडूला चमक आणण्यासाठी थुंकीचा वापर केला जातो. ज्यामुळे चेंडूसह स्विग करणे शक्य होते. मात्र, आयसीसीच्या (ICC) नव्या नियमानुसार, सामना दरम्यान चेंडूला चमकवण्यासाठी आता खेळाडूंना लाळेचा वापर करता येणार नाही.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटच्या नियमातही मोठा बदल करण्यात आला आहे. याआधी चेंडूला चमक आणण्यासाठी थुंकीचा वापर केला जातो. ज्यामुळे चेंडूसह स्विग करणे शक्य होते. मात्र, आयसीसीच्या (ICC) नव्या नियमानुसार, सामना दरम्यान चेंडूला चमकवण्यासाठी आता खेळाडूंना लाळेचा वापर करता येणार नाही. परंतु, आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 19 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळरूचे कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूला थुंकी लावताना दिसला. मात्र, आयसीसीचा नियम लक्षात आल्याने विराट कोहली लगेच सावध झाला. त्यावेळी त्याने प्रतिक्रिया दिलेली प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संकंटाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने काही महत्त्वपूर्ण नियमांना मंजूरी दिली आहे. महत्वाचे म्हणजे खेळाडूंकडून चेंडू चमकवण्यासाठी लाळचा वापर केला जातो. मात्र, चेंडूला थुंकी किंवा लाळ लावल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे आयसीसीने या गोष्टीस मनाई केली आहे. खेळाडूंनी चेंडूला लाळ लावली तर पंचांकडून खेळाडूला दोन वेळा इशारा दिला जाईल. तरीही खेळाडूने नियमांचे उल्लंघन केले तर जो संघ फलंदाजी करत असेल त्या संघाला पाच धावांची पेनल्टी म्हणजे त्या संघाच्या धावांमध्ये पाच धावा आणखी जोडल्या जाणार आहेत. हे देखील वाचा-Virat Kohli Completes 9000 T20 Runs: विराट कोहली याची नव्या विक्रमाला गवसणी; टी-20 क्रिकेटमध्ये 9 हजार धावा करणारा ठरला पहिला भारतीय
ट्विट-
कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 12 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पाने आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केले. कोलकाताच्या संघ फलंदाजी करत असताना रॉबिनने चेंडू चमकण्यासाठी लाळचा वापर केला होता. एका प्रेक्षकाने रॉबिनचा व्हिडिओ मोबाईल मध्ये कैद करून सोशल मीडियावर शेअर केले होते. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)